गावगाथा

मुरूम निरंकारी मंडळाकडून परिसर स्वच्छता मोहिम संपन्न

येथील संत निरंकारी मंडळाकडून ज्ञानदान विद्यालयाचा परिसर स्वच्छता करताना पुरुष व माता भगिनी

मुरूम निरंकारी मंडळाकडून परिसर स्वच्छता मोहिम संपन्न

HTML img Tag Simply Easy Learning    

मुरुम, ता. उमरगा, ता. २७ (प्रतिनिधी) : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (दिल्ली), मुरुम शाखेच्या वतीने संत निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या ७० व्या जन्मदिनाचे औचित्य साधून संपूर्ण जगात गुरुपूजा दिन साजरा केला जातो. सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेवजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या कृपा आशीर्वादाने रविवारी (ता.२५) रोजी स्वच्छ चल स्वच्छ मन मोहिमेअंतर्गत ज्ञानदान विद्यालयात परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर नारायणकर होते. यावेळी विजयकुमार फुगटे, कल्लेश्वर पांचाळ, रमेश मिणीयार, सुरेश कोळी, अण्णाराव कुलकर्णी, सुभाष जाधव, दगडू दिक्षीवंत, लक्ष्मण राठोड, हणमंत मंडले, राम राठोड आदिंची प्रमुख उपस्थिती होती. शाळेचा आतील व बाहेरील परिसर स्वच्छता सेवादल बिरु बंदीछोडे, दत्ता बोडरे, परमेश्वर जाधव, समर्थ साखरे, समर्थ चव्हाण, सार्थक बोडरे तर सेवादल बहिणजी अनुसया नारायणकर, उषा साखरे, अनिता देडे, श्रध्दा साखरे, समर्थ साखरे आदिंनी घनकचरा, गवत व झाडे-झुडपे तोडून परिसर स्वच्छ केला. कमल शेवाळे, मंगल घोडके, अनिता जामगे, रंजना बदोले, अश्विनी पांचाळ, मुक्ताबाई कोळी, जयश्री सोनवणे, बालिका बनसोडे, राधा डोईजोडे, अश्विनी बिराजदार, रेणुका बिराजदार, सावित्री बिराजदार, भारत बेगमपुरे, सरिता सुपेकर, सानिका चव्हाण आदिंनी पुढाकार घेवून अभियान यशस्वी केले. या अभियानाचे प्रास्ताविकपर मनोगत निरंकारी मंडळाचे मुखी दयानंद साखरे यांनी केले. सूत्रसंचलन किशोर चव्हाण तर आभार तुकाराम शेवाळे यांनी मानले. शहर व परिसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील संत निरंकारी मंडळाकडून ज्ञानदान विद्यालयाचा परिसर स्वच्छता करताना पुरुष व माता भगिनी

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button