
*चपळगाव प्रशालेत मराठी राजभाषा दिन संपन्न!*
चपळगाव
27 फेब्रुवारी म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस! हा दिवस मराठी राजभाषा म्हणून साजरी करतात.आज ग्रामीण विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चपळगाव येथे जेष्ठ कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य मूली सर यांच्या हस्ते संपन्न झाले.
व्यासपीठावर CEO N.M.पाटील सर, बानेगाव सर, कदम सर, उटगे सर, विजापूरे सर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी
मराठी साहित्यातील अनेक कवीचें काव्यसुमनांचे
सादरीकरण केले.
इ.8 वी मधील विद्यार्थिनीं कु. प्रणिती भुसूनगे, कु. शर्वरी नारंगकर, क्रांती शिवशरण,कु.प्रतीक्षा इंगळे कु. गायत्री बावकर यांनी मराठी गौरव गीतावर नृत्य सादर केले.
मराठी सप्ताह निमित्त श्रीमती पाटील मॅडम यांनी घेतलेल्या हस्ताक्षर स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु. सफूरा पिरजादे व कु.समीक्षा शिंदे या विध्यार्थिनींनी केले.
यावेळी सर्व गुरुजन वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.