
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलनात मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा..

अक्कलकोट: महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या सौ. सुरेखा कल्याणशेट्टी माध्य. व उच्च माध्यमिक मराठी, सेमी व कन्नड विद्यालय, मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गिरीजामाता मराठी व सेमी इंग्रजी विद्यालय, नालंदा विद्यार्थी वसतिगृह यांच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक श्री मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जुनियर कालेजच्या प्रमुख सौ पूनम कोकळगी, सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी हे उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता 5 वी ते 9 वी वर्गातील मुलामुलींनी विविध सुंदर मराठी समुहगीत सादर केले. कुमारी श्रद्धा मोरे, शुभांगी पाटील, नैतिक चौघुले, सोमनाथ भुरले तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख खंडेराव घाटगे यांची मराठीची थोरवी या विषयावर भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ कल्पना स्वामी यांना मानले याप्रसंगी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेशआवटे, निखिल भालेराव, प्रा. राजशेखर पवार, निशिगंधा कोळी व बहुसंख्य प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला..
