जागतिक विक्रम करत अक्कलकोट चे शिक्षक दानय्या कौटगीमठ ६५ वी सेट परीक्षा उत्तीर्ण !
अक्कलकोट: येथील के एल ई मंगरुळे प्रशाळेतील शिक्षक दानय्या कौटगीमठ यांनी केरळ सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.हा त्याचं ६५ वी सेट उत्तीर्ण

अक्कलकोट चे शिक्षक दानय्या कौटगीमठ ६५ वी सेट परीक्षा उत्तीर्ण !

अक्कलकोट: येथील के एल ई मंगरुळे प्रशाळेतील शिक्षक दानय्या कौटगीमठ यांनी केरळ सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.हा त्याचं ६५ वी सेट उत्तीर्ण होण्याचा जागतिक विक्रम आहे.


केरळ शासनाच्या अंतर्गत लालबहादूर शास्त्री सेंटर तिरुवानंतपरम यांनी२१ जानेवारी२०२४ रोजी केरळ राज्यात प्राध्यापक पात्रात परीक्षा घेण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल दिनांक२९ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत अक्कलकोट चे शिक्षक यांनी पेपर क्रमांक एक मध्ये ७३ गुण आणि पेपर क्रमांक दोन मध्ये ६४ गुण अशी एकूण १३७ गुण घेऊन ५७.०८ टक्यांनी उत्तीर्ण झाले आहेत..सलग ६५ वेळा सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचा जगतिक विक्रम स्वतःच्या नावावर कोरले आहेत. या मध्ये ३५ सेट ,४ नेट ,२५ टी ई टी आणि १ पी एच डी अशी एकूण ६५ परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विक्रम केलात. या क्षेत्रात तब्बल १२ वर्षे अभ्यास केले असून , देशातील जम्मु काश्मीर ते केरळ आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेश सर्व राज्यातील सेट परीक्षा उत्तीर्ण होत ,स्वतः ला आलेले अनुभवा च्या सहाय्याने इतर विद्यार्थ्यांना यु ट्यूब च्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन करीत आहेत.दानय्य सरांच्या मार्गदर्शन घेऊन आता पर्यंत ४६२ विद्यार्थी नेट सेट टी ई टी ,पी एच डी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत .देशातील वेगवेगळ्या विद्यापीठ ला जाऊन कार्यकाळ घेऊन प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना सखोल आणि अचूकपणे माहिती देत आहेत.तसेच स्वतः यु ट्यूब चॅनेल काढून, त्याच्या द्वारे इंग्रजी, मराठी आणि कन्नड भाषेत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करीत आहेत.
