गावगाथा

आमदार सचिनदादानां मंत्रिमंडळात मिळणार स्थान ? अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चर्चा

राजकीय चर्चा

आमदार सचिनदादानां मंत्रिमंडळात मिळणार स्थान ? अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात चर्चा

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना आगामी राज्याच्या मंत्रिमंडळ फेरबदलात स्थान मिळणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर रंगली आहे .अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची सर्वत्र चर्चा सुरू असून मंत्रिमंडळ फेरबदलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातील ८ मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे.
मुख्यमंत्री दिल्लीत असताना राज्याच्या राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. जवळपास ८ मंत्र्यांना बदलण्यात येणार असून त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा विजयी झाले आहेत. विकासासाठी धडपडणारा लोकप्रतिनिधी अशी ओळख आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे वजनदार युवा नेते म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे पाहण्यात येते. भाजपासाठी आश्वासक चेहरा म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची ओळख राज्याच्या राजकारणात झाली आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघावर असलेली मजबूत पकड ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध , जनतेचे लाभलेले मोठे पाठबळ , विकास कामांसाठी निधी आणणारा आमदार , कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा नेता अशी वेगळी ओळख आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी निर्माण केली आहे. नुकत्याच झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने वर्चस्व राखले आहे. यामुळे सोलापूर जिल्हासह राज्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी निर्माण केल्याने त्यांना आगामी राज्याच्या मंत्रिमंडळ फेरबदलात स्थान मिळणार मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारातून व्यक्त केली जात आहे. राज्यातील आठ मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असून आता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सत्ताधारी सरकारकडून सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात सत्ताधारी भाजपाचे आमदार अधिक असतानाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. आता मंत्रिमंडळ फेरबदला तरी स्थान मिळणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे जिव्हाळ्याचे संबंध पाहता आमदार कल्याणशेट्टी यांना मंत्रिमंडळ फेरबदलात स्थान मिळण्याची आशा दुणावली आहे. याबाबत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात व जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button