सोलापुरातील रंगभवन व पाण्याच्या टाकी जवळील बस थांब्याजवळ निवारा शेड उभे करण्याचा विवेकानंद परिवार अक्कलकोटचा निर्णय
निवारा शेड अभावी उन्हात नागरीकाना होत असलेल्या वृत्ताची तात्काळ घेतली दखल

सोलापुरातील रंगभवन व पाण्याच्या टाकी जवळील बस थांब्याजवळ निवारा शेड उभे करण्याचा विवेकानंद परिवार अक्कलकोटचा निर्णय

निवारा शेड अभावी उन्हात नागरीकाना होत असलेल्या वृत्ताची तात्काळ घेतली दखल

.
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) सोलापूर शहरातील रंगभवन व पाण्याची टाकी या ठिकाणी एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाचे निवारा शेड अभावी उन्हात पावसात बस ची वाट पाहत असता मोठा त्रास होत होता याबाबत चे वृत्त प्रसार माध्यमामध्ये प्रसिद्ध होताच ही अडचण तात्काळ दुर करण्याचा निर्णय विवेकानंद परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आ सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतला . सध्या आग ओकणाऱ्या सुर्याच्या उन्हापासुन व पावसाळ्यात संरक्षण मिळावे म्हणून विवेकानंद परिवार व विवेकानंद मल्टी स्टेट को क्रेड्रीट सोसायटी वतीने निवारा साठी येणारा संपूर्ण खर्च उचलणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी व्यवस्थापक चंद्रकांत दसले यांनी दिली
. सोलापुर येथील शांती चौक पाण्याची टाकी व रेगभवन येथे अक्कलकोट कडे येणारे प्रवाशी एस टी बस ची प्रतिक्षा करीत उभे असतात . सध्या सोलापुर चे तापमान 43 पर्यंत पोहचले आहे सुर्य नारायण आग ओकीत आहे सोलापुरला कामा निमित्य येणाऱ्या जाणाऱ्या व समर्थाच्या दर्शनासाठी अक्कलकोटकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे . रंगभवन व पाण्याची टाकी येथे बसची प्रतिक्षा करीत थांबलेल्या प्रवाशांना निवारा शेड ची अंत्यत गरज असल्याची बाब प्रवाशी वर्गाची मागणी प्रसार माध्यमांनी निदर्शनास आणली होती . याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच आमदार सचिन कल्याणशेट्टी ‘यांनी याची तात्काळ दखल घेतली .विवेकानंद परिवार व स्वामी विवेकानंद पतसंस्था व स्वामी विवेकानंद मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी लि. यांच्या वतीने रंगभवन व पाण्याची टाकी येथे प्रवाशानां उन्हापासुन व पावसा पासून संरक्षण व्हावे याकरिता निवारा शेड तात्काळ उभे करू अशी ग्वाही दिली . निवारा शेड याकरिता येणारा खर्च विवेकानंद परिवारचे अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली .
चौकट
विवेकानंद परिवार सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा, समुपदेशन, पहिल्या मुलीच्या नांवे ठेव, रद्दीतुन शिक्षणा अंतर्गत गुणवंत विदयार्थ्याना शिष्यवृत्ती,योग शिबिर रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर, समाज प्रबोधन व्याख्यानमाला, कोरोना मध्ये उपचार, धान्य, जेवण वाटप आदि विविध उपक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून राबविले जातात याचाच भाग म्हणून प्रवाशासाठी निवारा शेड उभे करून प्रवाशाची गैरसोय दुर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विविकानंद परिवाराच्या सामाजिक दामीत्वा बद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
