
जॉय संस्थेला माणुसकी समाजरत्न पुरस्कार जाहीर

पूनम पाटगावे
मुंबई प्रतिनिधी


प्रेरणा फाउंडेशन संस्थेच्या वतीने कल्याण येथील अत्रे नाट्यगृहात दिनांक ४ मे २०२४ रोजी मतिमंद मुलांच्या मदतीसाठी एका खास नाटकाचे आयोजन प्रेरणाच्या संस्थापक, लेखिका, समाजसेविका दीप्ती गावकर कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी जमा झालेला निधी या बालकांच्या कल्याणासाठी दिला गेला. यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांना माणुसकी समाजरत्न पुरस्कार देऊन प्रमुख पाहुणे वैभव कुलकर्णी, दिलीप नारकर, जितू गुप्ता, सुनील इंगळे, गुरुनाथ तिरपणकर उपस्थित होते. यावेळी मुंबई महाराष्ट्रात सातत्याने चांगले काम अविरतपणे करीत असलेल्या जॉय ऑफ गिविंग मुंबई या संस्थेचा देखील माणुसकी रत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.जॉय तर्फे संस्थापक गणेश हिरवे आणि जॉय चे मुंबई अध्यक्ष चंद्रशेखर सावंत यांनी पुरस्कार स्वीकारला.जॉय संस्थेचे काम उल्लेखनीय असून गणेश हिरवे सरांच्या माध्यमातून आणि पुढाकाराने संस्थेचे सभासद आणि दानशूर व्यक्तीच्या मदतीने जॉय अनेकांना सहकार्य करीत असते.कोणताही ऋतू असला तरी जॉय चे काम थांबलेले नाही.गोरगरीब विद्यार्थी, आश्रमशाळा, नैसर्गिक आपत्ती, वृद्धश्रम, आदिवासी पाडे आदी लोकांसाठी जॉय प्रामुख्याने काम करते.पुरस्कार मिळाल्याने अनेक मान्यवरांनी जॉय चे अभिनंदन केले आहे.याआधी देखील जॉय संस्थेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.यावेळी आयोजक प्रेरणा गावकर लिखित दोन अंकी आकांत या नाटकाचा प्रयोग दाखविण्यात आला.
