गावगाथा

शासनाकडून जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाची जीआर निघाले…. 50 कोटीचे निधी तरतूद

लिंगायत समन्वय समितीच्या लढायला यश

 शासनाकडून जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाची जीआर निघाले…. 50 कोटीचे निधी तरतूद

*लिंगायत समन्वय समितीच्या लढायला यश*

सोलापूर -जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला पन्नास कोटी मंजूर करून आज राज्य शासनाने त्याबाबत जीआर काढले आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले,आमदार डॉ. विनय कोरे, आमदार सत्यजित तांबे आणि अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर यांचे लिंगायत समन्वय समितीच्या वतीने समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे. लिंगायत समाजाच्या विविध मागण्याकरिता मुंबई येथे लिंगायत महामोर्चा संपन्न झाला होता.

राज्य शासनाने विविध मागण्या पैकी आज महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ निर्माण करून महाराष्ट्रातील हजारो बेरोजगार लिंगायत तरुणांना स्वतंत्र व्यवसाय उभा करण्यासाठी 50 कोटी निधी उपलब्ध होणार असून त्यांच्यासाठी रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे असे विजयकुमार हत्तुरे म्हणाल. महाराष्ट्र राज्यामध्ये एक कोटी पेक्षा जास्त लिंगायत समाजाची लोकसंख्या आहे त्या मानाने मंजूर असेल निधी अपुरा पडतो पुढच्या वर्षी किमान 500 कोटी निधी महामंडळास उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करणार असल्याचे लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितले. खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिव(उस्मानाबाद),खासदार धैर्यशील माने पाटील (इचलकरंजी),खासदार बंडु जाधव (परभणी) तसेच आमदार, माजी खासदार,माजी आमदार, लोकप्रतिनिधी व महाराष्ट्रातील लिंगायत समाजातील विविध संघटनाचेही अभिनंदनशासनाने जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित केल्यामुळे संपूर्ण लिंगायत युवकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button