अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील शेतकरीच्या मुलीचं सुस्मिता संजय पाटील इस्रो मध्ये मोलाचं योगदान….
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन ( ISRO) भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन अंतर्गत रिजनल रिमोट सेनसिंग सेंटर वेस्ट झोन जोधपूर मध्ये ज्युनियर प्रोजेक्टर म्हणून सेवा

अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील शेतकरीच्या मुलीचं सुस्मिता संजय पाटील इस्रो मध्ये मोलाचं
योगदान….


अक्कलकोट : चुंगी गावची कन्या सुस्मिता संजय पाटील यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन ( ISRO) भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन अंतर्गत रिजनल रिमोट सेनसिंग सेंटर वेस्ट झोन जोधपूर मध्ये ज्युनियर प्रोजेक्टर म्हणून सेवा केली आहे.
कर्नाटक सेंट्रल युनिव्हर्सिटी येथून जियो इन्फॉर्मेटिक मधून गोल्ड मेडल मिळवुन भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटन जोधपूर येथे डॉ बी के भद्रा इसरो सायंटिस्ट खाली प्रोजेक्ट वर्कर म्हणून सेवा केली आहेत..


सुश्मिता पाटील यांनी इसरो मध्ये केलेले कार्य कौतुक आणि अभिमानस्पद आहे. वडील शेतकरी असून मुलीने अतिशय उत्तुंग सेवा करून इसरो ची आणि भारताची नावं सुवर्ण अक्षरात लिहलेले आहेत. अक्कलकोट येथील सेट नेट परीक्षेत विश्व विक्रम केलेले धानय्य कौटगीमठ यांच्या घरी आज इसरो ची प्रोजेक्ट वर्कर म्हणून सेवा केलेले सुवर्ण पदक विजेते सुश्मिता पाटील यांची शाल ,श्रीफळ आणि श्री स्वामी समर्थ प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
