राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा युवा मिशन अंतर्गत अक्कलकोट तालुका आढावा बैठक संपन्न
अक्कलकोट तालुका आढावा बैठक संपन्न

राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा युवा मिशन अंतर्गत अक्कलकोट तालुका आढावा बैठक संपन्न

अक्कलकोट — राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार साहेब,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राकेश कामठे यांच्या सूचनेनुसार स्अक्कलकोट येथे सोलापूर जिल्ह्याचे युवक निरीक्षक संग्रामसिंह पाटील साहेब, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक भैया आव्हाड, कार्याध्यक्ष अक्षय भांड यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. निरीक्षक संग्रामसिंह पाटील साहेब यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला व संघटनेविषयी योग्य त्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष शंकर पाटील, युवक तालुकाध्यक्ष शांतकुमार सलगरे, शहराध्यक्ष सागर सोमवंशी, मैंदर्गी शहराध्यक्ष किरण लोणी यांनी आपल्या कामाचा निरीक्षक संग्रामसिंह पाटील यांना आढावा दिला. युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना लवकरात लवकर तालुका व शहर कार्यकारणी तयार करण्यासाठी सूचना दिल्या.
अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावागावात, शहरातील प्रत्येक वॉर्डात शाखा ओपनींग आणि 1 बूथ 10 युथ प्रमाणे सर्व बूथ कार्यकारणी तयार करणार असल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीस अक्कलकोट तालुक्याचे नेते, तालुकाध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे, युवक नेते अविराज दादा सिद्धे, राजेंद्र सूर्यवंशी, श्रीशील चितली यांच्यासह अक्कलकोट तालुक्यातील व शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
