छत्रपती वृक्षसंवर्धन समिती मैंदर्गी कडून वनविभाग परिसरात पशूपक्ष्यांसाठी तहान भागवण्यासाठी कृत्रिम पाणवठा…
विधायक उपक्रम

छत्रपती वृक्षसंवर्धन समिती मैंदर्गी कडून वनविभाग परिसरात पशूपक्ष्यांसाठी तहान भागवण्यासाठी कृत्रिम पाणवठा…


अक्कलकोट दि १७ – छत्रपती वृक्षसंवर्धन समिती मैंदर्गी कडून वनविभाग परिसरात पशूपक्ष्यांसाठी तहान भागवण्यासाठी कृत्रिम पाणवठा तयार करण्यात आले. मार्च महिन्यात प्रचंड तापमान वाढलेले असून, यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळे पाणवठे सगळे रिकामे असल्याकारणाने पशूपक्ष्यांची पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत हे ध्यानात घेऊन छत्रपती वृक्षसंवर्धन समितीच्या माध्यमातून कृत्रिम पाणवठा तयार करण्याचे ठरविण्यात आले व कामाची सुरुवात 26 जानेवारीला करण्यात आली त्या दिवशी खड्डा घेण्यात आला आणि नंतर कामाच्या व्यापात पक्षीतिर्थाचे काम पुर्ण करण्यासाठी महिनाभराचा वेळ लागला अखेर 25 फेब्रुवारी ला मुहूर्त लागला आणि एकाच दिवसात पाणवठा पुर्णत्वास आला.


या पाणवठ्याचा माध्यमातून पशूपक्ष्यांची उन्हाळ्यातील तहान भागेल एवढं मात्र नक्की आहे. या पक्षीतिर्थ पाणवठ्याच्या निर्माण कार्य पार पाडण्यासाठी छत्रपती प्रतिष्ठान, मैंदर्गी व छत्रपती वृक्ष संवर्धन समितीचे अनिल नागणसूर, सचिन भासगी, गुंडाराज नाशी,रमेश भैरामडगी, अनिल जुजगार, योगेश फुलारी, बसवराज सवळी यांचे मोलाचे योगदान लाभले.

तसेच छत्रपती प्रतिष्ठान मैंदर्गी ने अक्कलकोट तालुक्यात २००० पेक्षा जास्त वृक्ष लागवडीचा काम पूर्ण केला असून त्यांचा संगोपन पण करत आहेत.