गावगाथा

मोहिते पाटील परिवार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यास पक्षासह जिल्ह्याच्या विकासाला गतवैभव प्राप्त होईल -प्रा. प्रकाश सुरवसे.

*रणजित दादा निश्चितच नेतृत्व करतील.*

मोहिते पाटील परिवार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यास पक्षासह जिल्ह्याच्या विकासाला गतवैभव प्राप्त होईल -प्रा. प्रकाश सुरवसे.

अक्कलकोट – (प्रतिनिधी) शरद पवार साहेबांचे आजही विजयदादांवर विशेष प्रेम आहे. मधल्या काळात पक्षातील “दादा”गिरी ला वैतागून मोहिते पाटील परिवाराने भाजपा मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पण आता भाजप ने देखील दादागिरी सोबत सोयरीक केल्यामुळे विकासाचे व्हिजन असलेल्या मोहिते पाटील परिवाराला जिल्ह्यात काम करायला म्हणावा तसा स्पेस मिळणार नाही. असे दिसते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह जिल्ह्याच्या विकासाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मोहिते पाटील परिवाराने शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष बळीराम काका आणि विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून पुन्हा एकदा कार्यमग्न व्हावे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रकाश सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

अक्कलकोट येथे आयोजित पत्रकारांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना प्रा. सुरवसे म्हणाले, सोलापूर जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. प्रत्येक तालुक्यातील समविचारी नेत्यांना विश्वासात घेऊन प्रत्येकासोबत बंधुताचे संबंध ठेवताना विकास कामांबाबत न्याय देत हा बालेकिल्ला विजय दादांनी अबाधित ठेवला होता. परंतु दादा आणि परिवार अलिप्त झाल्यापासून केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर जिल्हाच नेतृत्वशून्य झाला आहे. त्याकरिता पूर्वीचे दिवस पुन्हा पाहायला मिळायचे असतील तर मोहिते पाटील परिवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्यासाठी शरद पवार साहेबांनी स्वतः प्रयत्न केल्यास जिल्ह्याचे चित्र पालटल्याशिवाय राहणार नाही. यावेळी ……….आदी उपस्थित होते.

*रणजित दादा निश्चितच नेतृत्व करतील.*

“जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळींना पुन्हा एकदा एकत्र करून जिल्हाध्यक्ष बळीराम काकांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित आबा पाटील यांना सोबत घेऊन ही मोट बांधण्यात रणजित दादा निश्चित यशस्वी होतील. राष्ट्रवादी युवक चे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना दादांनी ती चुणूक दाखवली होती. त्यासाठी पवार साहेबांनी हे राजकीय ऋणानुबंध जुळवून आणावेत ही माझ्यासह जिल्ह्यातील तमाम जनतेची अपेक्षा आहे” – प्रा. प्रकाश सुरवसे , जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button