गावगाथा

अक्कलकोटच्या संकल्प सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडुन सत्ताधाऱ्यांवर आक्रोश..

हन्नुरचे एसएसबी केंद्र का होऊ शकले नाही-सुशीलकुमार शिंदेंचा सवाल..

हन्नुरचे एसएसबी केंद्र का होऊ शकले नाही-सुशीलकुमार शिंदेंचा सवाल..

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोटच्या संकल्प सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडुन सत्ताधाऱ्यांवर आक्रोश..

HTML img Tag Simply Easy Learning    

नुसते मंजुरी नको निधीची तरतुद करुन घ्या- म्हेत्रेंचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना आव्हान…

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट प्रतिनिधी- केंद्रातील मोदी सरकारने सोलापुरच्या जनतेला खोटी आश्वासने देऊन फसवण्याचे पापकर्म केले आहे.ते खोटे बोलण्यात पटाईत आहेत.आमदार तुमचाच,खासदार तुमचाच,राज्य सरकार तुमचेच अन् केंद्र सरकारही तुमचेच..! मग असे असतानाही अक्कलकोट तालुक्यातील
हन्नुर येथील माळरानावरील नियोजित एसएसबी केंद्र गेल्या दहा वर्षांपासून प्रतिक्षेत का..? असा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित केला.

HTML img Tag Simply Easy Learning    

आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी कडून अक्कलकोट येथे संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार निरंजन टकले,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,आमदार प्रणिती शिंदे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार,चेतन नरोटे,अश्पाक बळोरगी, बाबा मिस्त्री, माजी नगराध्यक्षा सुवर्णा ताई मलगोंडा, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा शीतल ताई म्हेत्रे, दुधनी मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रईस टिनवाला, बाबासाहेब पाटील,सुनिता हडलगी,मुबारक कोरबु,बंदेनवाज कोरबु,सुनिल खवळे,राम जाधव,मल्लिकार्जुन काटगाव, सिध्दार्थ गायकवाड,सिध्दु भंडारकवठे,लाला राठोड, विश्वनाथ भरमशेट्टी,अरुण जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी वळसंगचे उपसरपंच अरिफ कुरेशी व गौडगावचे शरबसप्पा पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की,ही लढाई कदाचित अंतिम असेल.भाजप सत्तेवर आल्यास आमच्यासह सर्वसामान्य जनतेचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.
या सभेसाठी अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांमधून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले.तर आभार विश्वनाथ हडलगी यांनी मानले.

HTML img Tag Simply Easy Learning    

नुसते मंजुरी नको निधीची तरतुद करुन घ्या- म्हेत्रेंचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना आव्हान…

अक्कलकोटच्या संकल्प सभेत माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर टीका केली.अलीकडच्या काळात अक्कलकोटसाठी मोठ्या प्रमाणात निधीची मंजुरी मिळाल्याचा गवगवा होत आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे.नवख्या आमदाराला निधीची केवळ मंजुरी देऊन तोंडावर हात फिरविले जात आहे.देगाव एक्स्प्रेस कॅनॉलच्या उर्वरित तीस टक्के कामासाठी ३७० कोटी निधीची मंजुरी मिळाली आहे.विद्यमान आमदारांनी येत्या अधिवेशनात जास्तीत जास्त निधीची तरतूद करुन दाखवण्याचे आव्हान म्हेत्रे यांनी कल्याणशेट्टी यांना दिले.

खासदार बाबांचे मौन!अन् तुमचे आमदार काय करताहेत-आमदार प्रणिती शिंदे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर व विरोधात बोलण्याची हिंमत खासदारांमध्ये नाही.आपले खासदार तर जगावेगळे आहेत.त्यांना जेव्हा बोलायला संधी मिळते,तेव्हा त्यांचा मौनव्रत ठरलेला असतो.असे लोकप्रतिनिधी आपले काय कल्याण करतील असा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.तर अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात अत्यल्प पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रलंबित पीकविमा,चारा छावण्या व शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी व्यस्त असलेले तुमचे रक्षण आमदार सध्या काय करत आहेत असा टोला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर प्रणिती शिंदे यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button