स्वामी भक्तांचा विस्तार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर – डॉ.मृणालिनी फडणवीस
डॉ.फडणवीस यांचा सहकुटुंब सत्कार करताना महेश इंगळे, प्रा.शिवराय आडवितोट दिसत आहेत.

स्वामी भक्तांचा विस्तार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर – डॉ.मृणालिनी फडणवीस

आपला भारत देश हा जसा कृषीप्रधान देश आहे. तसाच भक्तीप्रधान देश आहे. त्यामुळे येथील भाविकांचे अनेक दैवत श्रद्धास्थान आहेत. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची प्रचिती अनेक भाविकांना येत असल्याने श्री स्वामी समर्थांवरही अनेक भाविकांची मनोभावे श्रद्धा आहे, या पाश्वभुमीवर भारताच्या नागरिकांची भक्ती पाहून पश्चिमात्य राष्ट्रातील नागरिक ही स्वामीभक्तीत येत आहेत, याची माहिती आपल्याला विविध स्तरातून मिळत आहे.
ही बाब स्वामी भक्तांकरिता, दत्त सांप्रदाय करिता व अक्कलकोट करिता खूपच आनंदाची बाब आहे, त्यामुळे स्वामी भक्तांचा विस्तार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असल्याचे मनोगत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी डॉ.मृणालिनी फडणवीस यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. याप्रसंगी कुलगुरू डॉ.फडणवीस बोलत होते. या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, सी.बी.खेडगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराय आडवीतोट, शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – डॉ.फडणवीस यांचा सहकुटुंब सत्कार करताना महेश इंगळे, प्रा.शिवराय आडवितोट दिसत आहेत.
