दिन विशेष

मुरूम नगर परिषदेच्या वतीने शीला फलक अनावरण,स्वातंत्र्य सेनानी,माजी सैनिकांचा सत्कार

मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानी यांचे वारस, माजी सैनिकांचा येतोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये २५ स्वातंत्र्य सेनानी तर ४६ माजी सैनिकांचा समावेश आहे.

मुरूम नगर परिषदेच्या वतीने शीला फलक अनावरण,स्वातंत्र्य सेनानी,माजी सैनिकांचा सत्कार

HTML img Tag Simply Easy Learning    

मुरूम ता.१४, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे सांगता समारंभ “माझी माती माझा देश” या अभियानांतर्गत मुरूम नगर परिषदेच्या वतीने दि.१४ ऑगस्ट वार सोमवार रोजी जिल्हा परिषद मुलांची शाळेत प्रशासकीय मान्यवर यांच्या हस्ते “शिलाफलक” अनावर व तसेच पंचप्रण शपथ, स्वातंत्र्य सेनानी,माजी सैनिकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरूम नगर परिषद मुख्याधिकारी सचिन भुजबळ तर मुरूम पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक रमाकांत शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक ममाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करून शीला फलकाचे अनावरण करण्यात आले. यामध्ये शहिदांचे शिलाफलक उभारण्यात आले असून त्यावर पंतप्रधानांचा श्रद्धांजली संदेश,अभिवादन संदेश लिहिण्यात आला आहे. शिलाफलक अनावरणांतर उपस्थितांनी पंचप्रण शपथ कार्यक्रम पार पडला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य सेनानी यांचे वारस, माजी सैनिकांचा येतोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये २५ स्वातंत्र्य सेनानी तर ४६ माजी सैनिकांचा समावेश आहे. यावेळी मुरूम शहरातील प्रतिष्टीत नागरिक,पत्रकार,विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, नगर परिषद सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरव वडे, सूत्रसंचालन विजयकुमार देशमाने तर आभार सुमित पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button