गावगाथा

डॉ.बसवराज सुतार यांच्या हृदयस्पंदन हार्ट केअर क्लिनीकचे उद्घाटन ; पंढरपूर वैद्यकीय सेवेचे हब निर्माण झाली आहे – किशोरराजे निंबाळकर…

पंढरपूर येथे डॉ.बसवराज सुतार यांच्या हृदयस्पंदन हार्ट केअर क्लिनीकचे उद्घाटन

डॉ.बसवराज सुतार यांच्या हृदयस्पंदन हार्ट केअर क्लिनीकचे उद्घाटन ; पंढरपूर वैद्यकीय सेवेचे हब निर्माण झाली आहे – किशोरराजे निंबाळकर…

पंढरपूर येथे डॉ.बसवराज सुतार यांच्या हृदयस्पंदन हार्ट केअर क्लिनीकचे उद्घाटन 

पुर्वी एखादा मोठा आजार झाला कि उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत होती.आता पंढरपूर येथेच वैद्यकीय सेवेचे हब निर्माण झाल्याने सर्वच आजारांवर चांगले उपचार मिळू लागले आहेत.यात आता हृदयाच्या सर्व आजारांवर उपचार करणार्या हृदयस्पंदन क्लिनीकची भर पडली असल्याने पंढरपूरातील वैद्यकीय सेवा अधिक विस्तृत झाली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा आयोगचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी केले.

पंढरपूर येथे डॉ.बसवराज सुतार यांच्या हृदयस्पंदन या हार्ट केअर क्लिनीकचे उद्घाटन किशोरराजे निंबाळकर,ब्रम्हानंद सुतार,सुवर्णा सुतार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी किशोरराजे निंबाळकर बोलत होते.

या कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वनाथ भरमशेट्टी, स्वेरीचे डॉ.बी.पी.रोंगे,माजी नगराध्यक्ष नागेश भोसले,डिव्हीपीचे अमर पाटील, माजी सभापती सिध्दार्थ गायकवाड, डॉ.व्ही. ए.व्होरा,डॉ.शितल शहा,डॉ.सुरेंद्र काणे,डॉ. वर्षा काणे,डॉ .तेजस भोपटकर,डॉ.सुनिल कारंडे,डॉ.महेश सुडके, डॉ.अमरसिंह जमदाडे,डॉ.संजय देशमुख,डॉ.सुनिल पवार, डॉ.कोलपकवार, नगरसेवक सुजित सर्वगोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये डॉ.बसवराज सुतार यांनी सांगितले की,रुग्णांना परवडेल असे योग्य उपचार आधुनिक पध्दतीने देण्याचा मानस असून हृदयाच्या सर्व आजारांच्या उपचारासह मार्गदर्शनाचा संकल्प ठेवला आहे तर जिल्ह्यातील एकमेव इलेक्ट्रोफिजिओजिस्ट उपचार या ठिकाणी होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी रामचंद्र सुतार,डॉ.उमाश्री सुतार,नेहा सुतार, डॉ.सानिका भट्टड,संपर्क अधिकारी महेंद्र कांबळे,कोमल पांढरे आदींसह डॉक्टर्स, अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button