ठळक बातम्यागावगाथाजिल्हा घडामोडी
Chinchwad | जेष्ठ पत्रकार मदन जोशी यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी निधन
निगडी प्रतिनिधी दि.२२, - चिंचवड येथील ज्येष्ठ पत्रकार मदन जोशी ( वय 67) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

मदन जोशी यांनी फोटोग्राफर आणि पत्रकार म्हणून तब्बल 40 वर्षापेक्षा जास्त काळ काम केले. अनेक दैनिके, साप्ताहिके, मासिके यामध्ये त्यांनी काम केले. जोशी यांना नाट्य क्षेत्राची आवड होती. राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात त्यांचा वावर होता.

चिंचवड लिंक रोड येथील स्मशानभूमीत सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी,मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे.
