गावगाथा

जल साक्षरता काळाची गरज जागतिक जल दिनी ड्रीम फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय जल साक्षरता संमेलन उत्साहात

रानवेध फाउंडेशन & आम्ही मंद्रूपकर ग्रुपला जलनायक पुरस्कार

रानवेध फाउंडेशन & आम्ही मंद्रूपकर ग्रुपला जलनायक पुरस्कार

HTML img Tag Simply Easy Learning    

जल साक्षरता काळाची गरज जागतिक जल दिनी ड्रीम फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय जल साक्षरता संमेलन उत्साहात

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर / जागतिक जल,वन व हवामान दिनाच्या औचित्याने ड्रीम फौंडेशन आणि इतर सामाजिक संस्था यांच्या वतीने शुक्रवार दी 22 मार्च रोजी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील भीमा व सिना नदीच्या पवित्र संगमावरवरील ऐतिहासिक श्री संगमेश्वर मंदिर येथील सभागृहात आणि निसर्गरम्य परिसरात 11 वे राष्ट्रीय जल साक्षरता संमेलनाचे उद्घाटन जल तज्ञ ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी,वरिष्ठ भू वैज्ञानिक मुस्ताक शेख आणि डॉ पोपट माळी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि रोपाला पाणी देऊन करण्यात आले यावेळी व्यासीठावर शाहीर रमेश खाडे, आयटीआय एन एस एस प्रमुख प्रा पुकाळे एस,एस, प्रा कंपली मॅडम, माजी सैनिक चंद्रशेखर बिराजदार,रानवेधचे विनोद कामतकर,संगमेश्वर मंदिर समितीचे संगप्पा केरके,मल्लिकार्जुन नरोणे,मधुकर बिराजदार संयोजक काशिनाथ भतगुनकी आदी उपस्थित होते,
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत प्रा, पुकाले यांनी केले प्रास्ताविक काशिनाथ भतगुणकी यांनी केले,या संमेलनात दिवसभर विविध मान्यवरांचे मार्गदर्शन झाले संमेलन अध्यक्ष श्री रजनीश जोशी यांनी जल आणि जनजागृती गरजेचे असून वाढते जल संकटावर नियोजन खूप महत्वाचे आहे अनेक गावात युवक पुढाकार घेऊन अनेक विधायक उपक्रम राबऊन जल संकटावर मात करून लोकांसमोर एक आदर्श ठेवले आहेत ,सोलापूरच्या पाणी पुरवठा यासाठी उजनीच्या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे,जल नियोजन मध्ये लोकांचे प्रबोधन व जल प्रदूषण त्यावर उपाय करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी कमी पाण्यातील शेती करणे व बदलते हवामान यानुसर अभ्यास करून पीक घ्यावेत पाणी व प्रदूषण यातून होणारे दुष्परिणाम यावरही मार्गदर्शन केले,संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार रजनीश जोशी यांनी उजनी जलाशय येथील जल प्रदूषण व पाण्यावर अभ्यास केलेली माहिती लोकांना दिले यावेळी युवक,महिला व शेतकरी यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले
प्रारंभी सकाळी 90वा भीमा व सिना संगमावर जल पूजन मा सामाजिक कार्यकर्ते एम के फाऊंडेशन चे संचालक नागेंद्र कोगनुरे यांच्या हस्ते व शाहीर रमेश खाडे यांच्या हस्ते झाले
जल साक्षरता संमेलन उद्घाटन प्रसंगी माजी संमेलना अध्यक्ष मा शाहीर रमेश खाडे यांनी पोवाडे,गाणी व लावणी आणि लोकगीत यातून जण प्रबोधन केले,या संमेलनात दक्षिण पत्रकार संघाचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी,रानवेध फाऊंडेशन चे विनोद कामतकर, अमोघसिद्ध लांडगे,अशोक सोंनकटले, शिवराज मुगले, बिरपा रूपनुरे,बालाजी वाघे, गिरमल गुरव, गुरुदादा गायकवाड,सिवप्पा स्वामी, आरिफ शेख आणि
औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींचे एन एस एस विभाग आणि श्री संगमेश्वर प्रशाला व ग,रा चितळे प्रशाला येथील विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी झाले होते,दिवसभर झालेल्या संमेलनात आम्ही मंद्रूपकर टीमला जलनायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समारोप प्रसंगी जीवन गाणी हा सांस्कृतिक कार्य विद्यार्थी आणि कलाकारांनी सादर केले,
श्री संगमेश्वर मंदिर समितीतर्फे सर्वांना प्रसाद देण्यात आले,
जल संमेलन अखंड 11वर्ष आयोजित करण्याचे कार्य काशिनाथ भतगुणकी यांनी केले असून ते कौतुास्पदच आहे असे मत विनोद कामतकर यांनी केले, सूत्रंचालन प्रा,पी,सी पूकाले यांनी केले तर संगापा केरके यांनी आभार व्यक्त केले.

आम्ही मंद्रूपकर ग्रुपला जलनायक पुरस्कार

HTML img Tag Simply Easy Learning    

मंद्रूप मध्ये विविध सामाजिक व पर्यावरण उपक्रम राबवणाऱ्या रानवेध फाउंडेशन व आम्ही मंद्रूपकर ग्रुपला ड्रीम फाउंडेशन आयोजित जलसाक्षरता संमेलनात *जलनायक पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रवी केवटे, सिद्धेश्वर नंदुरे, जगन्नाथ खरात, श्याम गोसावी, अजय साठे, विनोद कामतकर उपस्थित होते.
—-

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button