गावगाथा

हजरत पीर जिंदावली बाबा यात्रेस उडगी येथे सोमवारीपासून प्रारंभ

यात्रा उत्सव

हजरत पीर जिंदावली बाबा यात्रेस उडगी येथे सोमवारीपासून प्रारंभ

उडगी:- 

उडगी ता.(अक्कलकोट) येथील ग्रामदैवत व हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रतीक असलेल्या हजरत पीर जिंदावली बाबा ७९ व्या उरूस यात्राचे सालाबादप्रमाणे यंदाही पार पडत आहे. २५ मार्च ते २७ मार्च असे तीन दिवस विविध धार्मिक,संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती यात्रा कमिटीकडून देण्यात आली.
२५ मार्च रोजी रात्री १० वाजता संदल(गंध)कलगी-तुऱ्याचा सामना, शोभेचे दारुकाम,२६ मार्च रोजी चिराग(दीप)व दिवसभर कलगीतुरा कन्नड गाणी सादरीकरण, रात्री १० वाजता “तवरूमने कुंकूम ” सुंदर सामाजिक कन्नड नाटक, २७ मार्च सायं.५ वाजता जंगी कुस्त्या होणार आहेत.
उडगीतील चालक-मालक संघटना वतीने संदलच्या दिवशी यात्रेकरुना मोफत वाहनांची सोय केली आहे.यात्रा कालावधीत परगावीहून येणाऱ्या भक्तांना मल्लिकार्जुन मंगल कार्यालयात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या यात्रेसाठी शिवानंद यळमेली,पंडित म्हेत्रे, यासीन मुजावर, मालबा कुसेकर, रमेश गायकवाड, खाजाभाई चंदनवाले,चंद्रकांत पाटील,अंकुश नारायणकर, बसय्या मठपती, रमेश भांड, तुळजप्पा माडयाळ,पिरप्पा कुंभार, सिद्रय्या सोड्डे ,धोंडूराज बनसोडे,उमेश कोळी,स्वामीनाथ आलूरे, कृष्णा पुजारी,रामचंद्र म्हेत्रे, सरपंच बसवराज कोळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष धोंडप्पा यळमेली हे परिश्रम घेत आहेत.
पीर जिंदावली बाबा यात्रे निमित्त,क्रिकेट स्पर्धा, उडगी मित्र परिवार वतीने २५ मार्च रोजी रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले असून या शिबिरात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होऊन सामाजिक कार्यास हातभार लावावा असे आहावान संतोष बिराजदार ,सिद्धू निंबाळ,आकाश भांड, विपुल जिगजंबगी, आनंद यळमेली यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button