गावगाथा

जागतिक लिंगायत महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी विजयकुमार हत्तुरे यांची निवड

निवड नियुक्ती

सोलापूर – जागतिक लिंगायत महासभेचे प्रधान सचिव डॉ. शिवानंद जामदार (IAS) यांनी महाराष्ट्रातील लिंगायत समाज व संघटना मजबूत करण्यासाठी युवा नेते विजयकुमार हत्तुरे यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या खांद्यावर जागतिक लिंगायत महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवडीची घोषणा बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत केली होती.

जागतिक लिंगायत महासभेचे महाराष्ट्र प्रभारी तथा कलबुर्गी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभुलिंग महागावकर यांनी विजयकुमार हत्तुरे यांना निवडीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील लिंगायत समाज एकत्रित करून संघटनेचा राज्यभर विस्तार करण्यात येणार आहे. समाजाच्या उन्नतीसाठी या संघटनेत युवकांना प्राधान्यक्रम देणार असल्याचे माहिती हत्तुरे यांनी दिली.

याप्रसंगी महासभेचे प्रदेशाध्यक्ष राजशेखर तंबाके (कोल्हापूर), उपाध्यक्ष मल्लिकार्जुन मुलगे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. शिवानंद गोगाव, ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार चन्नवीर भद्रेश्वरमठ, महिला जिल्हाध्यक्ष राजश्री थळंगे,शहराध्यक्ष विजयकुमार बावी,सरचिटणीस नागेंद्र कोगनुरे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष अमोल म्हमाणे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष डॉ. बसवराज नंदर्गी, जिल्हा उपाध्यक्ष शिवराज कोटगी,राजेंद्र होदे,डॉ. भीमाशंकर सिंदगी,सदाभाऊ पाटील, डॉ.राजेंद्र खसगी,नामदेव फुलारी,सकलेश बाबुळगावकर, मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे,बसवराज चाकाई,नागेश पडनुरे,श्रीशैल पॅडशिंगे,सिद्धाराम कटारे,श्रीशैल वाले,संतोष पाटील,नागेश धुम्मा,गंगदे मामा आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button