ठळक बातम्यागावगाथा

कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना लोखंडी हत्याऱ्याचा धाक दाखवून पळ काढलेल्या दोघांचा मुंढवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; हातभट्टी दारूसह जप्त केला तब्बल सव्वातीन लाखांचा मुद्देमाल

पुणे प्रतिनिधी दि.२५, एका पिक अप टेम्पो मधून हातभट्टी दारुची वाहतूक करत असताना टेम्पो अडविण्यासाठी उभे असलेल्या पोलिसांना लोखंडी हत्याऱ्याचा  धाक दाखवून पसार झालेल्या दोघांना मुंढवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सदर घटना आणि कारवाई शुक्रवारी (दि.22) पहाटे चारच्या सुमारास मुंढवा परिसरातील झेड कॉर्नर येथे घडली.

या कारवाईत महिंद्रा कंपनीचा पिकअप, 38 कॅन मधील 1140 लिटर तयार गावठी हातभट्टीची दारु आणि कोयता असा एकूण तीन लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विलास बाबासाहेब चव्हाण (रा. गुरुदत्त कॉलनी, काळेपडळ, हडपसर), बापु अशोक जाधव (रा. ॲमेनोरा विक्टरी टॉवर जवळ, लोणकर वस्ती मुंढवा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत होते. झेड कॉर्नर परिसरात पेट्रोलींग करत असताना पीकअप वाहन भरधाव वेगात येताना दिसले. गाडीचा संशय आल्याने पोलिसांनी खासगी वाहनाने पाठलाग करुन गाडी थांबवली. त्यावेळी पिकअप चालकाने पोलिसांना कोयता दाखवून गाडीतील व्यक्तीसह गाडीतून पळून जाऊ लागले. पोलिसांनी काही अंतरावर त्यांना आडवले.

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता, प्लास्टिकचे ड्रम भरलेले असल्याचे दिसले.पोलिसांनी खात्री केली असता त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारु असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कोयता, पिकअप वाहन, गावठी हातभट्टीची दारुसह सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त,
पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक गुन्हे बाबासाहेब निकम, सहायक पोलीस निरीक्षक संजय माळी, सहायक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब टापरे, सहायक पोलीस फौजदार संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, महेश पाठक, राहूल मोरे, योगेश गायकवाड, निलेश पालवे, स्वप्निल रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील
यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button