ठळक बातम्यागावगाथा
Pune Police : आता पुणे शहरातील सर्व हाॅटेल्स , रेस्टॉरंट आणि आईस्क्रीम पार्लर रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहणार; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची परवानगी

पुणे प्रतिनिधी दि, २९. पब, बिअर बार पाठोपाठ आता रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि आइस्क्रीम पार्लर हे देखील रात्री दीडपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र रस्त्यावरचे खाद्य पदार्थांचे स्टॉल्स रात्री साडेअकरानंतर बंद ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. कारण देशी दारूच्या दुकानांना सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत वेळ आहे. दारूच्या दुकानाजवळ अंडाभुर्जी, चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मद्यपी दारू पितात. त्यामुळे वेळेचे पालन न केल्यास अशा अंडाभुर्जी, चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
