गावगाथा बातमीचा इम्पॅक्ट “भुरिकवठे ग्रामपंचायतीला खडबडून जाग” तात्काळ सदर परिसर स्वच्छ करण्यात आले
भुरीकवठे ग्रामपंचायतीची कार्य तत्परता

गावगाथा बातमीचा इम्पॅक्ट “भुरिकवठे ग्रामपंचायतीला खडबडून जाग” तात्काळ सदर परिसर स्वच्छ करण्यात आले

भुरीकवठे ग्रामपंचायतीची कार्य तत्परता
भुरीकवठे तालुका अक्कलकोट येथील जिर्ण झालेल्या जुनी चावडी समोरील काटेरी झाडे झुडपे अस्वच्छ भाग तसेच लोहार यांच्या बोळातील तुंबलेली गटारीची सार्वजनिक स्वच्छता करण्यात यावी अशा आशयाचे लेखी निवेदन पंचवीस ग्रामस्थांच्या सहीने चार दिवसापूर्वी सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आले होते.
सदरील बातमी साप्ताहिक गावगाथा मधून प्रसिद्धही झाली होती याची दखल घेऊन कर्तव्यदक्ष अधिकारी रतन सिंह चव्हाण साहेब यांनी त्वरित चावडी समोरील लक्ष्मी देवीच्या मंदिरा पाठीमागील परिसर व लोहार गोळातील तुटलेली गटार देखील स्वच्छ करून घेऊन कार्यकरता दाखविली आहे
त्याबद्दल व्यक्तिशः ग्रामसेवक चव्हाण व सरपंच यांचे अर्जदार ग्रामस्थांच्या वतीने आभारी आहे अशीच सार्वजनिक स्वच्छता मोहीम संपूर्ण गावात राबविण्यात यावी ही अपेक्षा तसेच श्री हनुमान मंदिरासमोरील सार्वजनिक पाहण्याच्या टाकीला गळती होत आहे ती टाकी बदलून नव्याने पाण्याच्या टाकीची व्यवस्था लवकरच करण्यात यावी ही विनंती आपले स्नेहांकित मतदार बंधू भगिनी च्या वतीने पुनश्च एकदा आभारी आहे.
