गावगाथा

मुरलीधर मंदिर परिसर पाडकामास सुरुवात,नियोजित ‘मुरलीधर मंदिर भक्तनिवास बांधकाम करणेकामी घेण्यात आला निर्णय – महेश इंगळे

मुरलीधर मंदिराचे पाडकाम करणे कामी विधिवत पूजा करताना महेश इंगळे, आत्माराम घाटगे, महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, पुरोहित मनोहर देगावकर, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

मुरलीधर मंदिर परिसर पाडकामास सुरुवात,नियोजित ‘मुरलीधर मंदिर भक्तनिवास बांधकाम करणेकामी घेण्यात आला निर्णय – महेश इंगळे

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२९/३/२४)
(श्रीशैल गवंडी)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित श्रीमंत मृदुलाराजे जयसिंहराजे भोसले मुरलीधर मंदिर परिसराच्या पाडकामाची सुरुवात विधिवत होम हवन, यज्ञ, आहूती इत्यादी धार्मिक विधी करून करण्यात आले. या होमहवन व यज्ञकुंडाची पूजा पुरोहित मनोहर देगावकर व ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे, सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख यांच्या हस्ते संपन्न झाली. यानंतर मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते या मुरलीधर मंदिर परिसर पाडकाम करण्याचे शुभारंभ करण्यात आले. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित श्रीमंत मृदुलाराजे भोसले मुरलीधर मंदिर व परिसर हे जवळपास ५० वर्षांपूर्वीचे असून त्याचा हा परिसर आता जिर्णत्वास जात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या ठिकाणी भक्तनिवास बांधण्याचे निर्णय मंदिर समितीकडून घेण्यात आलेले आहे. स्वामी भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता देवस्थानचे भक्तनिवास येथे निवास व्यवस्थेकरिता जवळपास ३०० उपलब्ध खोल्या आता कमी पडत आहेत. गर्दीमध्ये भाविकांची गैरसोय होत आहे हे पाहून मुरलीधर मंदिरातील मुळ दगडी गाभारा व मंडप वगळून उर्वरीत सर्व परिसराचे पाडकाम करून या परिसरात सर्व सोयींनी युक्त सुसज्ज असे चार मजली भक्त निवास बांधण्यात येणार आहे. या माध्यमातून भविष्यात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीकडून भाविकांची येथे उत्तम निवास व्यवस्था होईल. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून बांधकामानंतर श्रीमंत मृदुलाराजे जयसिंहराजे भोसले मुरलीधर मंदिर भक्तनिवास अशी या मंदिराची ओळख राहणार आहे अशी माहिती महेश इंगळे यांनी याप्रसंगी दिली. याप्रसंगी पुण्यातील अभियंता नवनाथ बनकर, सुनील नायकोडी, श्रीशैल गवंडी, खाजप्पा झंपले, संतोष पराणे, भीमा मिनगले, अमर पाटील, संतोष जमगे, चंद्रकांत गवंडी, गिरीश पवार, स्वामीनाथ लोणारी, पुरोहित शशिकांत सलबते, ज्ञानेश्वर भोसले, शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील सर, विपुल जाधव, प्रसाद सोनार, महादेव मलवे, श्रीकांत मलवे, मनोज इंगुले, सुनील पवार, प्रशांत गुरव, वेदेश गुरव, शिवाजी गुजर, महेश काटकर, समीर नायकवाडी, स्वामीनाथ मुमूडले, महेश मस्कले, नागनाथ गुंजले, सागर गोंडाळ, आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – मुरलीधर मंदिराचे पाडकाम करणे कामी विधिवत पूजा करताना महेश इंगळे, आत्माराम घाटगे, महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, पुरोहित मनोहर देगावकर, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button