गावगाथा

*अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी चेअरमनपदी मंजुनाथ भतगुणकी तर व्हॉइस चेअरमनपदी पोमु राठोड यांची निवड*

निवड नियुक्ती

*अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी चेअरमनपदी मंजुनाथ भतगुणकी तर व्हॉइस चेअरमनपदी पोमु राठोड यांची निवड*

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थसंजीवनी अशी ओळख असणाऱ्या तालुका शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी मंजुनाथ भतगुणकी तर व्हाईस चेअरमनपदी पोमु राठोड यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत चेअरमन पदासाठी मंजुनाथ भतगुनकी यांनी प्रतिस्पर्धी अभिजित सुर्डीकर यांचा 10 विरुद्ध 3 तर व्हॉइस चेअरमनपदासाठी पोमू राठोड यांनी प्रतिस्पर्धी परमेश्वर किणगे यांचा 9 विरुद्ध 4 अशा मतांनी पराभव केला.
अक्कलकोट तालुक्यात अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीच्या बनलेल्या या निवडणुकीत शिक्षक संघ(शिवाजीराव पाटील गट) ,शिक्षक समिती आणि आदर्श शिक्षक समिती यांनी एकत्र येत विरोधी पॅनेलच्या दोन्ही उमेदवाराचा मोठ्या फरकांनी पराभव केला.चूरशीच्या निवडणुकीसाठी संघटना एकजुटीची मोट बांधण्यात शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरभद्र यादवाड,शिक्षक समितीचे धुरंधर नेते राजशेखर उमराणीकर आणि आदर्श शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते शिवानंद अरळीगिड यांनी पुढाकार घेतला.
चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले;पण काही अतिमहत्वाकांक्षी संचालकामुळे ही निवडणूक लादली गेली. तरीसुद्धा विरोधी पॅनेलला केवळ 3 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे विरोधी गटाचे पानिपत झाल्याची चर्चा अक्कलकोट तालुक्यातील सर्वसामान्य शिक्षकांमध्ये होत आहे.
यावेळी माजी चेअरमन काशिनाथ विजापुरे,माजी व्हा चेअरमन राजश्री सोलापूरे,शिक्षक नेते तथा संचालक योगेश बारसकर,अपर्णा मानकोसकर-रंगदाळ,पुंडलिक कलखंबकर,सुनील सवळी,शंकर अजगोंडे,सिद्धाराम तेगेळ्ळी आदी संचालक उपस्थित होते.
तसेच या निवडीवेळी शिक्षक संघाचे राज्य नेते अशोक पोमाजी, सदस्य रेवनसिद्ध हत्तुरे, सुरेश शटगार,गुरुनाथ नरुणे,ध ल बिराजदार,तसेच शिक्षक समितीचे मार्गदर्शक नेते एस के बिराजदार,कन्नड जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव,तालुका समितीचे अध्यक्ष शंकर अजगोंडे,सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे प्रवक्ता बालाजी गुरव,कार्यकारी सचिव सतीश वाले,जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण म्हेत्रे,अक्कलकोट तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष बसवराज खिलारी,सरचिटणीस शशिकांत रंगदाळ,कार्याध्यक्ष सतीश पाटील,कोषाध्यक्ष भीमशा चौगुले,उपाध्यक्ष व्यंकट धर्मसाले,मार्गदर्शक श्रीमंत गजा,बालाजी हादवे दक्षिण सोलापूर शिक्षक संघाचे अध्यक्ष महिबूब सवार, कार्यकारी अध्यक्ष मल्लिनाथ पुजारी,भीमराव पाटील,संजय मंगरुळे,संजय देवकते तसेच मागासवर्गीय सेलचे विद्याधर शिवशरण,तालुका आदर्श शिक्षक समितीचे पदाधिकारी आदिनी उपस्थित राहून नूतन चेअरमन निवडीचे अभिनंदन केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button