गावगाथा

पाच वर्षाच्या चिमुकल्याने कडक उन्हातही ठेवला रमजानचा रोजा उपवास..!

वय 5 वर्ष 5 महिने अन् म्हणाला मी पण रोजा ठेवतो..

पाच वर्षाच्या चिमुकल्याने कडक उन्हातही ठेवला रमजानचा रोजा उपवास..!

HTML img Tag Simply Easy Learning    

वय 5 वर्ष 5 महिने अन् म्हणाला मी पण रोजा ठेवतो..

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट – इस्लाम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू असून, अक्कलकोट तालुक्यातील भुरिकवठे येथील सध्या सोलापूर येथे आहेत 
अवघ्या पाच वर्षाच्या चीनुमिया मौला शेख यांचे नातू रिजान खुतबोद्दीन शेख या चिमुकल्याने दमछाक करणाऱ्या कडक उन्हाळ्यातही उपवास ठेवल्याने त्याचे कौतुक केले जात आहे. वय 5 वर्ष 5 महिने LKG मध्ये शिकणाऱ्या बालकाने आपली आई सिरीन व वडील खुतबोद्दीन यांच्याकडे सध्या सुरू असलेल्या रमजानच्या पवित्र रोजेविषयी दररोज काय खायचं अन् काय खायचं नाही याविषयी दररोज विचारपूस करत असे त्यावेळी त्याचे आई वडील त्याला सांगत होते की बेटा लहान मुले रोजा करत नसतात. तू मोठा झाला की रोजा कर असं सांगताच तो नाही नाही मला सुध्दा रोजा ठेवायचं आहे हट करत बोलत असे. दररोज पहाटे तो आपल्या आई वडीलासोबत सहेरी साठी उठत होता.पण तो अजून लहान आहे ऊन खूप आहे म्हणून त्याला रागावून झोपी घालत होते.
पण आजच्या 21 व्या रोजे दिवशी त्याने आई वडील उठण्या अगोदर स्वतः उठून ब्रश करून फ्रेश होऊन तयार झाला आणि मला सुध्दा आज रोजा करायचं आहे असे ठाण करताच वडिलासोबत सहेरी केला व झोपी गेला. सकाळी शाळेला जायची वेळ होत असताना आईने जेवण्यासाठी आग्रह केला तर नाही मी रोजा आहे मी पाणी सुध्दा पिणार नाही 9 वाजता शाळेला गेला जात असताना आईने बॅगेत पाणी बॉटल डबा बांधून दिला बेटा भूक लागली की जेवण कर पाणी पी म्हणून शाळेला पाठवून दिला.12 वाजण्याच्या सुमारास शाळेत मॅडमला फोन करून विचारलं तर रिजान आज रोजा केलाय म्हणे तो जेवण कर बोलल्यावर जेवला नाही.

HTML img Tag Simply Easy Learning    


अन् पाणी सुध्दा पिला नाही. असं बोलतच आश्चर्य वाटलं .1 वाजता घरी आल्यावर जेवण का नाही केला भूक लागली नाही का जेवण कर बोलल्यावर नाही मी रोजा आहे जेवण करत नसतात बोलला.अन् फ्रेश होऊन झोपी गेला 4 वा उठला उठल्यावर बेटा जेवण कर नाही मी नाही करत बोलला बेटा तू लहान आहेस का रोजा केला बोलताच त्याच्या तोंडून आवाज आला मला कलेक्टर व्हायचं आहे!!!म्हणून मी रोजा केलाय असा बोलला अरे वा!
चांगली गोष्ट आहे म्हणत त्याला बाजारात नवीन घेऊन जाऊन नवीन कपडे खायाला आणायला म्हणून घेऊन गेलो व संध्याकाळी 6.वाजता घरी आलो अन् संध्याकाळी बाळे येथील मस्जिद मध्ये जाऊन जमात सोबत रोजा इफ्तार केला.या बालकांचे आणखीन एक विशेष म्हणजे रमजान च्या पवित्र महिन्यातील तराबेची एक ही नमाज त्याने सोडलेली नाही.अश्या या कडाक्याच्या उन्हात लहान बालकाने रोजा पूर्ण करावा ही खूप मोठी गोष्ट आहे.. रिजान चा हा त्याच्या आयुष्यातील पहिला रोजा ठरला. व तो त्याने पूर्ण केला याबद्दल त्याचे सर्व पाहुणे व मित्र मंडळीमध्ये कौतुक होत आहे..

HTML img Tag Simply Easy Learning    

रीजान ने त्याच्या मनामध्ये ठरवलेले त्याचे स्वप्न पूर्ण होवो.हीच आल्हा चरणी प्रार्थना……

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button