गावगाथा

वागदरी श्री परमेश्वर रथोत्सव यात्रा निमित्त सुंदर सामाजिक कन्नड तवर मने कुंकूम नाटकाचे आयोजन…

यात्रा विशेष

वागदरी श्री परमेश्वर रथोत्सव यात्रा निमित्त सुंदर सामाजिक कन्नड तवर मने कुंकूम नाटकाचे आयोजन…

वागदरी येथील श्री परमेश्वर यात्रा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दि.१३ व १४ एप्रिल २०२४ रोजी सुंदर सामाजिक कन्नड तवर मने कुंकूम नाटक सादर होणार असल्याचे माहिती अशोक पोमाजी यांनी दिली आहे.
वागदरी येथील बसवेश्वर मंदिर समोरील पटांगणात होणा-या पहिला प्रयोगांचे उध्दघाटन उध्दोगपती संतोष हरकारे यांच्या हस्ते तर इंजिनिअर राजकुमार पोमाजी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला डॉ.शिवराज संगशट्टी, गौरीशंकर मेडिकलचे मालक महेश माणसे,ठेकेदार प्रकाश पोमाजी, सुनील सावंत, संतोष पोमाजी, प्रदिप पाटील, प्रदिप जगताप,तर दुस-या प्रयोगांचे उध्दघाटन रफिक मुल्ला, सरपंच श्रीकांत भैरामडगी यांच्या अध्यक्षतेखाली तर पंकज सुतार,रवि वरनाळे, राजकुमार निरोळी, सुधिर सोनकावडे,विरभद्र पोमाजी,शिवा घोळसगाव, परमेश्वर फुलमाळी,सायबु गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत.
वागदरी कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील गावं असल्याने या भागात कन्नड सामाजिक नाटक चा प्रभाव जास्त आहे.कन्नड भाषा, संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न नाटक मंडळ करित आहे.वाढती महागाई लक्षात घेता नाटक सादर करणे परवडणारे नाही,एक नाटक सादर करण्यासाठी जवळपास एक ते दीड लाख रुपये खर्च आहे.परवडणारा नाहीं तरी नाट्य कला जिवंत ठेवण्यासाठी जीवाचे रान करावा लागतो.त्या मानाने बक्षीस होतं नाही, नाटक चा खर्च अंगावर येतो.परतु यात्रा काळात लोकांच्या करमणूक होण्यासाठी यात्रेची शोभा वाढवावी म्हणून नाटक सादर करतात.कर्नाटक शासनाने अशा मंडळाना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button