स्वामींच्या वास्तव्यामुळे अक्कलकोटच्या नावलौकिकात भर – सुरेश चव्हाण
सुरेश चव्हाण यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

स्वामींच्या वास्तव्यामुळे अक्कलकोटच्या नावलौकिकात भर – सुरेश चव्हाण

(प्रतिनिधी अक्कलकोट) – अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अक्कलकोट नगरी ही स्वामींची कर्मभूमी आणि पुण्यभूमी आहे. वटवृक्ष मंदिरात याची प्रचिती भाविकांना आजही येते. स्वामी समर्थांच्या या प्रचितीमुळे स्वामी भक्तांची दिवसेंदिवस वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनाकरिता भाविकांचा उत्साह दिसून येत आहे.
त्यामुळे स्वामींच्या वास्तव्याने अक्कलकोटच्या नावलौकिकात भरच पडल असल्याचे भावोद्गार हिंदुत्ववादी राष्ट्रभक्त व सुदर्शन चॅनेलचे मुख्य संपादक सुरेश चव्हाण यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी
सुरेश चव्हाण यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. याप्रसंगी सुरेश चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत स्वीय सहायक नरेश प्रताप, राजु एकबोटे, तम्मा शेळके, अभिजित पाटील, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – सुरेश चव्हाण यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
