गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: भाविकांच्या सोईसह वटवृक्ष मंदीराचे उपक्रम कौतुकास्पद – कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा ; आ.सचिन कल्याणशेट्टी व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते मंगल प्रभात लोढा यांचा सत्कार

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (प्रतिनिधी): अक्कलकोट  येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान स्थित स्वामी दर्शनासाठी मंदीरात येणाऱ्या भाविकांकरीता असलेल्या सोई सुविधा या सर्वोत्तम दर्जाच्या आहेत. या सह मंदिर समितीचे सर्व धार्मिक सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र शासन कौशल्य विकास तथा उद्योजकता मंत्री (कॅबिनेट मंत्री) तथा धनाढ्य उद्योगपती मंगलप्रभात लोढा यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या उपस्थितीत तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते 

HTML img Tag Simply Easy Learning    

श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून मंगल प्रभात लोढा यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मंदीर समितीच्या विवीध कार्याचा आढावा घेतल्यानंतर बोलताना मंगल प्रभात लोढा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, चव्हाण साहेब, अडत व्यापार तथा उद्योगपती राजू हिप्परगी, नन्नू कोरबू, मंदीर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, श्रीकांत मलवे, दर्शन घाटगे, गिरीश पवार, विपूल जाधव, प्रसाद सोनार, तुषार मोरे आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button