गावगाथा

पुस्तकं भेट देण्याचा अनोखा छंद वेडा माणूस सामाजिक कार्यकर्ते लेखक – गणेश हिरवे

सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस

पुस्तकं भेट देण्याचा अनोखा छंद वेडा माणूस सामाजिक कार्यकर्ते लेखक – गणेश हिरवे

मागील दोन दशकांहून अधिक काळ मी पुस्तक भेट देण्याचा अनोखा छंद जोपासला असून आतापर्यंत साधारण तेरा हजारांहून अधिक पुस्तक विविध मान्यवर, ग्रंथालये, विविध क्रीडा स्पर्धा, सण उत्सव, पाहुणे मंडळी यांना भेट दिलेली असून आजही माझे हे काम सुरूच आहे.
माझ्या बॅगेत कायमच मी दोन चार नवीन पुस्तक मासिक ठेवतो.प्रवसा दरम्यान वा कुठेही कार्यक्रमात गेलो की काही व्यक्तींची ओळख झाली की मग त्यांना ती भेट देतो.माझ्या घरी येणाऱ्या नातेवाईक, मित्रमंडळी, व इतरांना देखील आठवण भेट म्हणून मी एखाद पुस्तक देत असतो.
सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात वाचना पासून लोक दुरावत चालले असून प्रत्यक्ष हातात पुस्तक घेऊन वाचणाऱ्यांची संख्या रोडावत चालली आहे.इतकेच काय मोबाईल येणारे चांगले मेसेज, कथा, लेख देखील लांबलचक असल्याने अनेकजण वाचायचं टळताना दिसतात.


पुस्तकांसारखा मित्र नाही आणि पुस्तक आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी दीपगृहाच काम करीत असतात. मंडाले येथे तुरुंगात शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली.आपले दिवंगत राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांचे कडे देखील त्यांचे निधन झाल्यावर त्यांचे कपाट उघडले तेव्हा अडीज हजार पुस्तकं सापडली.यावरून पूर्वीचे लोकांना वाचण्याचे किती महत्व आहे हे लक्षात येते.जेव्हा काही करण्यासारखे नसते, एकलकोंडे पणा वाढतो तेव्हा पुस्तकच आपली अधिक सोबत करीत असतात.एखाद्या शुभप्रसंगी आपण अनेकदा महागडे गिफ्ट देत असतो तेव्हा त्याबरोबरच एखाद छानस पुस्तक भेट दिले तर वाचन संस्कृती जोपासण्यााठी मदतच होईल.हल्ली अनेकजण पुस्तक भेट देताना दिसतात. वाचन करण्यासारखा चांगला छंद नाही.वाचनाने आपली भाषा सुधारते, अनेक नवीन शब्द आपल्याला माहीत होतात, ज्ञान वाढते.तेव्हा वाचन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग व्हायला हवा.निदान दिवसातून एखाद पान तरी प्रत्येकाने प्रामाणिकपणे वाचायला हवच.

गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button