
पुस्तकं माणसाला घडवतात – ऐश्वर्य पाटेकर

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

लहान मुलांवर वाचन संस्कार रुजणं महत्त्वाचं आहे त्यासाठी वाचनयज्ञ अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल.’ असे प्रतिपादन युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी केले. जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान, कल्याण आणि अक्षरबंध प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने अखंड वाचनयज्ञ उपक्रमांतर्गत ‘आठवणीतील वाचन’ या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
दहावा मैल येथील आजीचं पुस्तकांचं हॉटेलमधील अक्षरबाग येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुस्तकांची आई भीमाबाई जोंधळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून योग मॅरेथॉनच्या जागतिक विक्रमवीर डॉ. प्रज्ञा पाटील उपस्थित होत्या. वृक्षपूजन आणि ग्रंथपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. डॉ योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आठवणीतील वाचन या वाचन उपक्रमात सुरेखा बोराडे, सुबोध धर्माधिकारी, अविनाश बल्लाळ , उमेश माळगावकर स्मिता देशपांडे , हिरामण क्षीरसागर, प्रा अरुण देवरे वृंदा दुर्वे, दीप्ती पाटील , प्रदीप बडदे , कल्पना देशमुख , डॉ प्रकाश माळी , राजेंद्र वाघ , न्या. वसंतराव पाटील , माधुरी जोशी , स्वाती दामले , विजया दुधारे, प्रशांत कापसे , अनुकूल माळी , संगिता काळभोरे यांच्यासह अनेक वाचन प्रेमींनी कथा व कविता सादर केल्या. अवनी जोंधळे आणि ओजस्वी बागडे या छोट्या मुलींनी सादर केलेल्या कविता विशेष उल्लेखनीय ठरल्या. यावेळी अक्षरमंच प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी स्पर्धेमध्ये साप्ताहिक कल्याण वैभव (विश्वास शंकर कुळकर्णी) , साप्ताहिक कल्याण नागरिक (मच्छिंद्र युवराज कांबळे) , दीपोत्सव निर्धारचा (डॉ गिरीश महाजन), साप्ताहिक ठाणे नागरिक (सतीषकुमार भावे), चांगुलपणाची चळवळ (शुभांगी नितीन मुळे), विश्वभ्रमंती (मिलिंद बल्लाळ)
या दिवाळी अंकाना अक्षरगंध पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन डॉ. योगेश जोशी यांनी केले. प्रास्ताविक कल्याणी देशपांडे यांनी केले तर प्रवीण जोंधळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रीती जोंधळे, डॉ. साई बागडे, हेमंत नेहते, जयंत भावे, सप्तर्षी माळी, आरती कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्याने आयोजित या कार्यक्रमात आजीच्या पुस्तकांचे हॉटेल उपक्रमासाठी पै फ्रेंडस लायब्ररी आणि अक्षरमंच प्रतिष्ठानचे वतीने ५० पुस्तके प्रदान करण्यात आली असे प्रतिष्ठानचे सचिव हेमंत नेहते यांनी कळविले आहे.
