वटवृक्ष मंदिरातील सत्कार जीवनातील मोठा गौरव – मा.क्रिकेटपटू केदार जाधव
(श्रीशैल गवंडी, अक्कलकोट, दि.१९/०४/२५) – सर्वसामान्य स्वामी भक्तांप्रमाणे मीही स्वामी भक्त आहे. याच स्वामी भक्तीच्या माध्यमातून अक्कलकोटला आल्यानंतर समर्थांनी स्वामी दर्शनाची संधी वेळोवेळी देत रहावी. या माध्यमातून स्वामी कृपेचे वरदहस्त माझ्या व माझ्या कुटुंबीयांवर कायम रहावी याकरिता आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटूंब भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहे. स्वामींच्या दर्शनानंतर लाभलेला तथा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील विश्वस्त समितीच्या वतीने झालेला सत्कार म्हणजे जीवनातील मोठा गौरव असल्याचे मनोगत मा.प्रसिध्द क्रिकेटपटू केदार जाधव
यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना क्रिकेटपटू केदार जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीकांत मलवे, उद्योगपती प्रमोद साठे, केदार माळशेट्टी, अभिशेक लोकपूरे, भागानगरे, कापसे, प्रसाद सोनार उपस्थित होते.
फोटो ओळ – मा.क्रिकेटपटू केदार जाधव व कुटूंबियांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!