कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती प्रबोधन फेरी..
राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाचा उपक्रम

कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती प्रबोधन फेरी..

राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाचा उपक्रम

अक्कलकोट : लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा,मतदान तुमचा हक्क आहे, तुमच्या एका मतावर सरकारचे भवितव्य अवलंबून असते, मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडा अशी आर्त हाक मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती अभियानाच्या निमित्ताने नागरिकांना दिली..

महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था,अक्कलकोट संचलित कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदान जनजागृती प्रबोधन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाधिकारी प्रा. राजेश पवार व प्रा. शितल झिंगाडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
हन्नूर रोड परिसरातील कल्याणशेट्टी महाविद्यालया पासून प्रबोधन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. एस टी स्टँड, कारंजा चौक, बाजारपेठ व स्वामी समर्थ मंदिर आदी परिसरात विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले. ठिकठिकाणी मतदार स्त्री-पुरुषांनी विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी प्रबोधन पर फेरीत सहभाग नोंदवला.

या मतदान प्रबोधन फेरीचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, पुनम कोकलगी, रूपाली शहा, मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

फोटो ओळ कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती प्रबोधन फेरीत नागरिकांना मतदान करून पवित्र हक्क बजावा असा संदेश दिलाचौकटीतील मजकूर
मतदान प्रबोधन बोर्ड, ड्रेस कोड, घोषणाबाजी व कौतुक
कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती प्रबोधन फेरीत राष्ट्रीय सेवा योजनेचा ड्रेस कोड परिधान केला होता. तसेच हातात बोर्ड घेऊन एसटी स्टँड परिसरात घोषणाबाजी देखील केली. यावेळी मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनी विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीस प्रतिसाद दिला आणि कौतुक देखील केले..