कन्नड सामाजिक नाटकामुळे ग्रामीण भागातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळते – सुधीर सोनकवडे
ग्रामीण नाट्य संस्कृती

कन्नड सामाजिक नाटकामुळे ग्रामीण भागातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ
मिळते – सुधीर सोनकवडे


वागदरी – येथील श्री परमेश्वर रथोत्सव यात्रा निमित्त कन्नड सामाजिक नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले तिर्थ येथील प्रशालेचे प्राचार्य सुधीर सोनकवडे भावना व्यक्त केले. तसेच ग्रामीण भागात मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन म्हणजे नाटक. हे नाटक देखील उत्सव, सण-समारंभातून बघावयास मिळायचे.वर्षातून एखाद दोन वेळेस होणारे नाटकांचे प्रयोग म्हणजे रसिकासाठी एक पर्वणीच.
यामुळे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांची वाव मिळते.कसदार अभिनय, जिवंत कलाकृतीतून रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळते.
यावेळी सलग दोन दिवस झालेल्या नाटकाच्या प्रयोगाला प्रचंड गर्दी करत उत्तम प्रतिसाद नागरिकांनी दिला.सदरील नाटकाचे उद्याटक म्हणून उद्योगपती रफिक मुल्ला यांची उपस्थिती लाभली यावेळी वागदरी चे सरपंच श्रीकांत भैरामडगी, राजकुमार निरोळी,शिवा घोळसगांव,अशोक पोमाजी,शिवराज पोमाजी, दत्ता वरनाळे, माजी सरपंच रवी वरनाळे,राम पोमाजी, बाबूराव जावळकोटी,शरण सुरवसे, अमृत निंबाळे, पार्श्वनाथ आगरखेड,आदि मान्यवर उपस्थित होते
