गावगाथा

चांडाळ चौकडीच्या करामती कलाकारांचे काष्टी येथे स्वागत!

सत्कार सन्मान

चांडाळ चौकडीच्या करामती कलाकारांचे काष्टी येथे स्वागत!

अहमदनगर प्रतिनिधी:-
चांडाळ चौकडीच्या करामती मधील विनोदी अभिनय करणारे अभिनेते व किर्तनकार भरत शिंदे उर्फ बाळासाहेब,तसेच रामभाऊंच्या सासऱ्यांची भुमिका निभावणारे अण्णा उर्फ गणेश लोणकर सर यांचे काष्टी येथे स्वागत करण्यात आले.श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार या गावी किर्तन करून परतताना. काष्टी येथे त्यांनी आवर्जून भेट दिली.
यावेळी जेष्ठ पत्रकार, साहित्यिक संतोष शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी दिलखुलास संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की प्रत्येक माणसांमध्ये काहीतरी विशिष्ठ गुण असतो.आणि तो आपल्याला ओळखता आला पाहिजे.आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो.या उदात्त हेतुने काम करा .असा उपस्थितांना संदेश दिला.
यावेळी त्यांनी आपला भुंडींस हा मराठी चित्रपट १७ मे रोजी प्रदर्शित होत आहे .तो आवर्जून पाहण्यास सांगितले. अल्पावधीतच बाळासाहेब यांची संपुर्ण महाराष्ट्रात अभिनेता व किर्तनकार म्हणुन ओळख झाली आहे.भक्तीपर व समाज ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌प्रबोधनपर या विषयावर ते किर्तन करत असतात.चांडाळ चौकडीच्या वेबसिरीजमध्ये ते बाळासाहेब हे पात्र साकारत आहेत.ते रसिकांच्या पसंतीस उतरले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात आला.यावेळी चांडाळ चौकडीचे जेष्ठ कलाकार अण्णा (गणेश लोणकर सर ), पत्रकार, साहित्यिक संतोष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती शेलार , उद्योजक सागर शिंदे,उदय पाचपुते, बापुराव जगताप उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button