एमआयएम सोलापूर लोकसभा लढवणार नाही असे एमआयएमचे शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांचा निर्णय
निवडणूक

एमआयएम सोलापूर लोकसभा लढवणार नाही असे एमआयएमचे शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांचा निर्णय

अक्कलकोट प्रतिनिधी:(सोहेल फरास)
संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी एमआयएम सोलापूर लोकसभा लढवणार नाही असे एमआयएमचे शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी निर्णय घेतला.
गेल्या आठवडाभरापूर्वी एमआयएमचे शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी सोलापूर लोकसभेसाठी एमआयएम कडून उमेदवार देणार असे जाहीर केले होते त्यानंतर मुस्लिम समाजातून व एमआयएम पक्षातून नाराजी व्यक्त झाल्याचे दिसून आली.

त्यानंतर दोन दिवसापूर्वी फारूक शाब्दी यांनी
संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी एमआयएम सोलापूर लोकसभा लढवणार नाही असे एमआयएमचे शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी निर्णय घेतला.
फारूक शाब्दी यांच्या निर्णयाचा स्वागत सोलापूर शहरातील व अक्कलकोट, अक्कलकोट तालुक्यातील संविधान मांनणाऱ्या आणि मुस्लिम बांधवांनी या निर्णयाचा स्वागत केला.
एकंदरीत फारूक शाब्दि यांनी घेतलेल्या निर्णयाचा फायदा काँग्रेसच्या मा.प्रणिती शिंदे यांना होणार.
कारण हेच फारुक शाब्दी आमदारकीला मा.प्रणिती शिंदे कडून थोड्याच मताने फारुक शाब्दी पराभव झाला होता.
आमदारकीला फारूक शाब्दि यांनी दोन नंबरचा स्थान ही घेतला होता फारूक शादी यांचा सोलापूर मध्ये मोठा चाहता वर्ग व मुस्लिम समाजाचा एकगठ्ठा मतदान फारूक शाब्दी यांना मिळाला होता.
मागील लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचितने युती करत जबरदस्त फाईट दिली होती. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास १ लाख ७० हजार मत प्राप्त करत, निवडणूकीचा निकाल बदलून टाकला होता. दलित आणि मुस्लिम मतांचा विभाजन झाल्याने काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला होता. भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर महाराज महास्वामी यांचा १ लाख ५८ हजार मतांनी विजय झाला होता.
यावेळेस मात्र फारूक शाब्दी यांनी घेतलेले निर्णय एकदम अचूक ठरणार कारण मुस्लिम समाजाची व संविधानला मानणाऱ्यांची मते विभाजन होऊ नये म्हणून फारूक शादी यांनी निर्णय घेतला असावा अशी चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
✍️ सोहेल फरास अक्कलकोट
९०२१६४४०३०
