सरपंच सौ वनिता मधुकर सुरवसे यांना तेजस्विनी महाराष्ट्राची हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
पुरस्कार निवड नियुक्ती

सरपंच सौ वनिता मधुकर सुरवसे यांना तेजस्विनी महाराष्ट्राची हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

मुंबई – एस एस सिनेव्हिजन व आझाद फाऊंडेशन यांच्या माध्यमातून मागील सहा वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात, कला, क्रीडा, प्रशासकीय, सामाजिक, राजकिय, उद्योग, शिक्षण, आरोग्य, संस्कृतीक या क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या प्रतिभावंत महिलांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात येत आहे.जेणे करून त्यांचा उत्साह वाढवा आणि इतरांना देखील त्यांच्या कर्तबगारी ची प्रेरणा मिळावी या हेतूने दर वर्षी हा पुरस्कार सोहळा सिकंदर सय्यद आणि आदम सय्यद यांच्या संकलपनेतून आयोजीत केला जात आहे.

यंदा तेजस्विनी महाराष्ट्राची या पुरस्काराने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिभावंत महिलांचा सन्मान मोठया दिमाखदार आणि सिनेसृष्टी, प्रशासकीय सेवेतील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यामध्ये सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या सोलापूरच्या जिल्हा समन्वयक तथा अक्कलकोट तालुक्यातील गोगाव गावच्या सरपंच सौ वनिता मधुकर सुरवसे यांना उत्कृष्ट सरपंच म्हणून तेजस्विनी महाराष्ट्राची हा राज्यस्तरीय पुरस्कार पुण्यामध्ये देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन एस एस सिनेव्हिजन चे डायरेक्टर सिकंदर सय्यद व आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष आदम सय्यद यांनी केले होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कल्पना कपीले, महाराष्ट्र पोलीस उपसंचालक (पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई)
ए सी पी संजय पाटील, अनेक सुपरहिट चित्रपट आणि टीव्ही सिरीयल चे दिग्दर्शक अर्शद खान, क्रिएटिव्ह व रियालिटी शोज चे दिग्दर्शक सलीम शेख, प्रसिध्द संगीत दिग्दर्शक हुमायू कबीर, सारेगम फेम गायिका निरुपमा डे, अभिनेत्री सिद्धी कामत, भारत सरकारच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय धावपटू इब्राहिम अरेभावी, रोजगानिर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या टॅलेंट कॉर्प सोल्यूशन चे संचालक डॉ. महेबुब सय्यद या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित सरपंच सौ वनिता मधुकर सुरवसे यांना त्यांच्या कामगिरी बद्दल तेजस्विनी महाराष्ट्राची पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
