स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

सर्धात्मक शिक्षणातील चिकाटी व स्वामी कृपेनेच एमपीएससीतील यश साध्य – दर्शना बिराजदार

दर्शना बिराजदार यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, सुनील कटारे व अन्य दिसत आहेत.

सर्धात्मक शिक्षणातील चिकाटी व स्वामी कृपेनेच एमपीएससीतील यश साध्य –
दर्शना बिराजदार

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.३१/७/२३) – कोणत्याही क्षेत्रात निभाव लागण्यासाठी माणसाच्या अंगी कलागुण व चिकाटी असणे आवश्यक असते. आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा निर्माण झालेली आहे, त्यामुळे एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धात्मक शिक्षणातही चिकाटी आपल्या अंगी असणे गरजेचे आहे. ही बाब ओळखून विवाहनंतरही स्पर्धात्मक शिक्षणाची कास धरत एमपीएससी स्पर्धा परीक्षेत भाग घेतले होते. अथक परिश्रम स्पर्धात्मक शिक्षणातील चिकाटी व स्वामी समर्थांच्या गुरुकृपेने एमपीएससीतील यश साध्य झाले असल्याचे प्रतिपादन तालुक्यातील बासलेगावच्या कन्या दर्शना बिराजदार-खाती यांनी केले. महाराष्ट्र राज्य एमपीएससी स्पर्धा परीक्षेत महिला वर्गातून तिसरा, तर राज्यात सातवा क्रमांक पटकावल्यानंतर दर्शना बिराजदार यांनी सर्वप्रथम येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी दर्शना बिराजदार-खाती यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला.याप्रसंगी दर्शना बिराजदार बोलत होते.
महेश इंगळे यांनी दर्शना बिराजदार या आपल्या मराठा मंदिरच्या श्री शहाजी प्रशालेचे माजी विद्यार्थिनी आहेत. पुढे महाविद्यालयीन शिक्षण वालचंद महाविद्यालय सोलापूर, बीएससीचे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशी, पदवीत्तर पदवी एमएससी मुंबई विद्यापीठातून घेतली आहे. त्यांचे वडील माथाडी कामगार म्हणून काम करीत असताना सीमावरती भागातून ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबात दर्शना बिराजदार यांचा जन्म झाला. परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी शिक्षण घेत हे यश संपादन केल्याने त्यांचा आम्हालाही सार्थ अभिमान आहे. नुकतेच पार पडलेल्या महाराष्ट्र पब्लिक सर्विस एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या असिस्टंट केमिकल एनालायझर क्लास टू मध्ये अंतिम यादीत राज्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत, तर सर्वसाधारण महिला प्रवर्ग मध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. यापुढे त्यांनी स्वामी कृपेने विविध क्षेत्रातील जनतेची सेवा करून सामाजिक बांधिलकी जोपासावी अशा प्रकारचे मनोदय व्यक्त करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, सुनील कटारे, विपुल जाधव, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, स्वामीनाथ लोणारी व बिराजदार कुटुंबीय उपस्थित होते.

फोटो ओळ – दर्शना बिराजदार यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, सुनील कटारे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button