नको जात पात हवा आहे विकास अशी घोषणा देत : कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली मतदान जनजागृतीची शपथ
मतदान जागृती

नको जात पात हवा आहे विकास अशी घोषणा देत : कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली मतदान जनजागृतीची शपथ

महाराष्ट्र दिनानिमित्त अभिनव उपक्रम
अक्कलकोट: जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन, नको जात पात, हवा आहे विकास, आयटी हब झालाच पाहिजे, अशी घोषणा देत कल्याणशेट्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली मतदान करण्याची शपथ..
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालया तील विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी तसेच केंद्रात बहुमताचे सरकार प्रस्थापित व्हावे म्हणून मतदान हे एक पवित्र कर्तव्य आहे, माझ्या एका मतामुळे केंद्रात मजबूत सरकार येणार आहे. म्हणून आम्ही मतदान करणार आहोत. नको जात पात- हवा आहे विकास असे म्हणत विद्यार्थ्यांनी मतदानाची शपथ घेतली. संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी विद्यार्थ्यांना मतदान करण्यासाठी शपथ दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, एनएसएस चे कार्यक्रमाधिकारी प्रा. राजशेखर पवार, डॉ शितल भस्मे, प्रा विद्याश्री वाले, प्रा विपुल जाधव, प्रा शितल फुटाणे, प्रा गुरुशांत हपाळे, डॉ बाळासाहेब पाटील उपस्थित होते. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, विज्ञान विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सौ रुपाली शहा मल्लिकार्जुन मसुती, यांनी कौतुक केले.

चौकटीतील मजकूर..
आम्ही मतदान करतो, तुम्ही आयटी हब आणा, आज आम्ही मतदान करण्याची शपथ घेतली आहे. माझ्या परिसरातील सर्वांना मतदान करण्यास आम्ही प्रवृत्त करू, परंतु संसदेत जाऊन अक्कलकोटचे प्रश्न कळकळीने मांडून येथे आयटी हब आणावा, त्यामुळे आमच्या हातात काम मिळेल अशी भावना उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.


अक्कलकोट परिसरात औद्योगिकीकरणासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आहेत, कारखानदारी विकसित होण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सोई उपलब्ध आहेत, आता दळणवळणाची चांगली सोय आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येथे कारखाने उभारले पाहिजे. गुंतवणूकदारांनी आर्थिक गुंतवणूक केली पाहिजे. असे प्रतिपादन यावेळी मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.
