
*रविवारी नीट ची परीक्षा*
*सोलापुरात १८ केंद्र, ७ हजार ७२४ परीक्षार्थी*

सोलापूर: वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नीट यूजी २०२४ ही परीक्षा ५ मे रोजी होणार आहे. सोलापुरातील १८ केंद्रावरून ७ हजार ७२४ परीक्षार्थीनी नोंदणी केल्याचे नीट सन्मवयक केएलईचे प्राचार्य शिवानंद शिरगावे यांनी सांगितले. परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत असले तरी सकाळी ११ वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रावर असणे अपेक्षित आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध करण्यात आले असून ते एनटीएच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना अर्ज अर्ज क्रमांक क्रमां व पासवर्ड टाकून डाऊनलोड करता येईल.

*परीक्षेसाठी साधा पेहराव आवश्यक :*
परीक्षेसाठी हाप शर्ट, जास्त खिसे नसलेली पॅण्ट असा पेहरात हवा. सॉक्स बुट चालणार नाही. साधी स्लिपर ज्यातून पाय दिसतील घालणे योग्य राहील.मुलींसाठी कानातले, नाकातले किंवा असे कोणतेही दागिने परिधान करू नये. मेटलचे बटन असलेले शर्ट घालू नका. घड्याळ, अंगठीही चालणार नाही. हॉल तिकीट, आधारकार्ड ओरिजनल व फोटो सोबत हवे.औषधे घेत असाल तर त्याचे प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवा. पेपर दोन भागात सोडवा, ते ठीक राहील.
