गावगाथा च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…! संपादक, धोंडप्पा नंदे यांना ‘उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार’ पुरस्कार प्रदान

कुरनूर (ता. अक्कलकोट) – राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, कुरनूर तर्फे देण्यात येणारा ‘उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार’ पुरस्कार यावर्षी धोंडप्पा नंदे यांना जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील समाजजीवन, शेती, शिक्षण, आणि संस्कृतीसाठी केलेल्या त्यांच्या प्रखर पत्रकारितेच्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येत आहे.


धोंडप्पा नंदे हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील वागदरी या गावचे असून, सध्या पुण्यात स्थायिक आहेत. शहरात राहत असूनही त्यांची पत्रकारिता ग्रामीण भागावर केंद्रित आहे. त्यांनी आजवर निष्कामपणे आणि निष्ठेने पत्रकारितेत काम केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जात आहे.


या पुरस्काराची घोषणा राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वजीत प्रकाश बिराजदार यांनी केली. पुरस्कार वितरण सोहळा 12 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी सात वाजता, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त, कुरनूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण पत्रकारितेला नवी दिशा मिळाल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले.