गावगाथा

श्रमजीवी परिवाराने असे कार्यक्षम हिरे पदरी बाळगले…. प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील

आदर्श महाविद्यालयात आयोजित प्रा. किरण सगर सेवा गौरव सत्कार प्रसंगी बोलताना कौतुकराव ठाले-पाटील

श्रमजीवी परिवाराने असे कार्यक्षम हिरे पदरी बाळगले…. प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील

HTML img Tag Simply Easy Learning    

मुरूम, ता. उमरगा, ता. ३१ (प्रतिनिधी) : या नगरीला पुरोगामीत्वाचा वसा आणि वारसा लाभलेला असल्याने त्याची बीजे इथे रूजली आहेत. त्यातीलच एक प्रा. किरण सगर आहेत. म्हणूनच सरांनी अध्यापन कार्यासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठवाडा साहित्य परिषद, फटाकेमुक्त दिपावली, पुस्तकांचे स्टॉल, बुवाबाजी विरूद्ध केलेला पर्दाफाश यांसारख्या अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामाचे कौतुक करून श्रमजीवी परिवाराने असे कार्यक्षम हिरे पदरी बाळगल्याचे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी व्यक्त केले. उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात श्रमजीवी परिवार व मराठवाडा साहित्य परिषद शाखा उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शनिवारी (ता.३०) रोजी प्रा. किरण सगर यांच्या सेवा गौरव सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या सेवागौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील होते. यावेळी संस्थेचे संचालक शिवमूर्ती भांडेकर, मल्लीनाथ दंडगे, डॉ. दादा गोरे, मसापचे कोषाध्यक्ष कुंडलिकराव अतकरे, अणदूरच्या जवाहर शिक्षण संस्थेचे रामचंद्र आलूरे, शब्बीर जमादार, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, डॉ. राजकुमार कानडे, प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, माजी प्राचार्य एन. डी. शिंदे, प्राचार्य एस. वाय. जाधव, गुंजोटीचे माजी सरपंच शंकरराव पाटील, साहित्यिक मोहिब कादरी, डॉ. प्रकाश थेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना कौतुकराव ठाले-पाटील म्हणाले की, मराठी भाषेची ओळख पुसली जात आहे. महाराष्ट्रीयन बांधवांनी वेळीच दखल घेतली नाही तर आपले भविष्य आपण बिघडवतोय. ही जबाबदारी इतरांवर टाकता येत नाही.
” आई ” या शब्दाचा उच्चार “आया ” केला जातोय. ही इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणातून मिळालेली देण आहे. याचं गांभीर्य आई-वडीलांनी लक्षात घ्यावं. तसेच सर्वच महाविद्यालयांनी प्रयोगशाळा व ग्रंथालयातील ग्रंथसंपदा वाढवावी; ज्यामुळे ज्ञानकेंद्र विकसित होईल. उत्तमांतील उत्तमाची देवाण-घेवाण व्हावी. यासाठी आदर्श महाविद्यालय हे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सिमेवर असल्याने कानडी एक भाषा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास चांगला परिणाम होईल. याला चालना देण्याचे काम साहित्य परिषद करेल अशी हमी दिली. यावेळी डॉ. दादा गोरे, कुंडलिक अतकरे, रामचंद्र आलूरे, शिवमुर्ती भांडेकर गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी विनायकराव पाटील म्हणाले की, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व घडवायला वेळ लागतो, ते टिकवायला त्यापेक्षा अधिक वेळ लागतो, हे काम अवघड आहे. पण सगर सरांनी ते काम उत्साहाने केले. जिथे अन्याय होतो तिथे राग येणे स्वभाविक आहे, पण त्यांनी कुठेही विध्वंसक आंदोलन न करताना स्वतःचा संयम ढळू दिला नाही. त्यांनी नेहमी समाजाचा पाठिंबा घेऊन काम केले म्हणूनच आम्ही नेहमी पालकत्वाच्या भूमिकेतून राहिलो आणि पुढेही त्यांना अशीच साथ आमची राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
* या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विश्वविनायक न्यूज रिपोर्टर मार्फत काढण्यात आलेल्या प्रा. किरण सगर यशोगाथा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या संपादकीय मंडळात प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. डॉ. शिवपुत्र कनाडे, मारोती कदम, प्रा. शरद गायकवाड सह, या पेपरच्या संपादिका प्रियंका गायकवाड, कार्यकारी संपादक विकास गायकवाड लक्ष्मण पवार आदींनी परिश्रम घेतले. प्रा. रमेश जकाते, प्रा. डॉ. आप्पासाहेब सोनकाटे, प्रा. अनिल बिराजदार, प्रा. संतोष इंगळे, प्रा. निळकंठ पाटील गुंडू सगर, अमोल पाटील, गुंडू दूधभाते, गो. ल. कांबळेसह श्रमजीवी परिवार व मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांनी केले.
सुत्रसंचलन उपप्राचार्य एस. जी. कुलकर्णी तर आभार प्राचार्या संध्या सगर यांनी मानले. या देखण्या व नियोजित कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील शैक्षणिक, साहित्यिक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिल्हातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी व परिसरातील प्रा. सगर सरांवर प्रेम करणारा मित्रपरिवार, हितचिंतक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. O चौकट O सेवा गौरवप्रसंगी कृतज्ञता व्यक्त करताना……… शैक्षणिक, साहित्यिक व अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात समर्पित भावनेने मला सेवा करता आली. मी आज नियत नियमानुसार निवृत्त होत असलो तरी मला या कार्यकाळात माझ्या संस्थेने व कुटुंबातील सदस्यांनी जी प्रेरणा, ऊर्जा व साथ दिली. त्यामुळे मला सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देता आल्याची भावना व्यक्त करून पुढेही या भूमिकेतूनच माझ्या हातून अधिक चांगले काम होईल, हे नक्की. प्रा. किरण सगर आदर्श कनिष्ठ महाविद्यालय, उमरगा

HTML img Tag Simply Easy Learning    

 फोटो ओळ : उमरगा, ता. उमरगा येथील आदर्श महाविद्यालयात आयोजित प्रा. किरण सगर सेवा गौरव सत्कार प्रसंगी बोलताना कौतुकराव ठाले-पाटील समवेत विनायकराव पाटील, डॉ. दादा गोरे. पुंडलिक अतकरे, भांडेकर गुरुजी रामचंद्र आलूरे, प्राचार्य दिलीप गरुड व अन्य.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button