मध्यवर्तीच्या वतीने ३ फेब्रुवारीला संत रोहिदास महराज मूर्ती प्रतिष्ठापना
रोहिदास जयंती विशेष

मध्यवर्तीच्या वतीने ३ फेब्रुवारीला
संत रोहिदास महराज मूर्ती प्रतिष्ठापना
——————–
सोलापूर : अनिष्ट प्रथा आणि रूढीला विरोध करणारे संत रोहिदास महाराज यांची ३ फेब्रुवारी पासून देशभरात जयंती साजरी होत आहे सोलापुरात पार्क चौकात चार हुतात्मा पुतळा येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने ३ फेब्रुवारी रोजी रोहिदास महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. याची माहिती………यांनी पत्रकार परिषदेत दिली.
४ फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन अभिवादन करण्यात येणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता चर्मकार समाजातील अधिकारी, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थित संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले जाणार आहे. मिरवणुकीचा खर्च टाळून जमलेल्या वर्गणीतून तीन दिवसात होणा-या उपक्रमांवर खर्च केला जाणार आहे.
या पत्रकार परिषदेस मध्यवर्तीच्या अध्यक्षा श्रीदेवी फुलारे, उपाध्यक्षा गौराबाई काेरे, पंकज लांबतुरे, सचिन कांबळे, सदस्य बबलू वनस्कर, सूर्यकांत व्हनकडे, रवी व्हनकोळे, सतीश ईश्वरकट्टी, खजिनदार अशोक सुरवसे, ईस्माईल हुलसुरे, सहसचिव अविनाश चाबकस्वार, मिरवणूक प्रमुख बाळासाहेब आळसंदे, सुलेखा लांबतुरे अशोक लांबतुरे, संजय शिंदे, परशुराम मग्रुखाने, राम कबाडे, मधुकर गवळी, गणेश तुपसमुद्रे, अजय राऊत, शावरप्पा वाघमारे, तानाजी जाधव, राजेंद्र कांबळे, मनोज हुलसुरे, सर्फराज कांबळे उपस्थित होते.
—
विविध उपक्रम…
या तीन दिवसात मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय व्याख्यानही होणार आहे. तसेच ५ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि महानगर पालिका सार्वजनिक रुग्णालयात जन्मलेल्या कन्यांना बेबी कीट, पौष्टीक आहार देण्यात येणार आहे. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी स्केटींग स्पर्धा घेऊन त्यांना पारितोषीके दिली जाणार आहेत.
—
सोलापुराता प्रथमच दहा फूट मूर्ती
माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे आणि जॉन फुलारे या दांपत्याने पाच लाख रुपये खर्चून १० फूट उंचीची संत रोहिदास महाराज यांची मूर्ती साकारली आहे. सध्या ती पुण्यातून आणण्याची प्रक्रिया सुरू असून सोलापुरात अशी मूर्ती प्रथमच साकारली गेली आहे. ती मध्यवर्तीला या दांपत्याने भेट स्वरुपात दिली आहे.
