“शिक्षक हे विद्यार्थ्यांना पुत्रवत प्रेम देणारे दैवत” —–प्राचार्य आवटे ——————————————— श्री क्षेत्र तीर्थ (ता.द.सोलापूर)दि.५ स्वतःच्या कुटुंबातील व्यक्ती पेक्षा वर्गातील विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम करुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे शिक्षक होय अशा शिक्षकांना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे. देशाचे तत्कालीन राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून सारा देश साजरा करतो ही गोष्ट शिक्षकांना आयुष्यभर प्रेरणा देणारी आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सखाराम आवटे यांनी श्री रामलिंगेश्वर शिक्षण संकुलात शिक्षक दिनानिमित्त आयोजित गौरव समारंभात केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी राष्ट्रपती डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कु.नम्रता घोंगडे, कु.राजश्री ऐवळे या विद्यार्थ्यिनीनी शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करणारी भाषणे केली.महेश पट्टणशेट्टी, नागराज पाटील, प्रा.रेवण मठपती मुख्याध्यापक सुधीर सोनकवडे,यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षक दिनानिमित्त संस्थेतर्फे पुष्पगुच्छ व लेखणी देऊन प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करतांना प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार म्हणाले की, विद्यार्थ्यांचे कल्याण होवो,प्रगती होवो, असा विश्वास देऊन वर्गातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे शिक्षक देश घडविण्यासाठी झिजत असतात. त्यांना मान सन्मान देऊन क्रुतद्न्यता व्यक्त करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेश पट्टणशेट्टी यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.