गावगाथा

*योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेस २१ लाखाचा निव्वळ नफा*

*योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेस २१ लाखाचा निव्वळ नफा*

सोलापूर-प्रतिनिधी-योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थापक चंद्रकांत अण्णा रमणशेट्टी स्थापना २७ वर्षांपूर्वी केली. गोरगरीब जनता व व्यापाऱ्यांना आर्थिक अडचण येऊ नये, गोरगरिबांच्या छोट्या मोठ्या व्यवहारांमध्ये व्यापारामध्ये वृद्धिंगत व्हावा सभासदाचे हित जोपासावे हा विचार आणि ध्येय ठेवून पतसंस्थेची वाटचाल सुरू आहे. पतसंस्थेने चांगली प्रगती केली. योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेस २१ लाखाचा निव्वळ नफा झाल्याची माहिती जिल्हा फेडरेशनचे संचालक चंद्रकांत अण्णा रमणशेट्टी यांनी दिले.
योगिनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा शंभू महादेव मंदिर रामराज्य नगर शेळगी येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना रमणशेट्टी बोलत होते. जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले त्यास उत्तर देताना त्यांनी त्यांची झालेली निवड ही माझी नसून ती सर्व सभासदाची निवड आहे असे मत व्यक्त केले व त्या सूचित न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे यावेळी मत मांडले. यावेळी व्यासपीठावर चेअरमन महेश प्रभुलिंग ठेसे, व्हाईस चेअरमन महादेव जावळे, संचालक सुनील पुजारी, आप्पासाहेब विभुते, डॉक्टर नारायण नायडू, सिद्राम मंठाळकर, सुनंदा जावळे, अरुणा ढंगे, केदार नांदुरे, सदाशिव उडता, डॉ. श्रीनिवास मेतन उपप्राचार्य, मल्लिकार्जुन पारशेट्टी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक चेअरमन महेश प्रभूलिंग ठेसे यांनी पतसंस्थेचा आर्थिक लेखाजोखा चालू वर्षी संस्थेस 36 लाख इतका ढोबळ नफा झाला आहे. नियमाप्रमाणे आवश्यक त्या तरतुदी करून संस्थेचे निवड एनपीए चे प्रमाण 0% असून, ऑडिट वर्ग अ गेली सत्तावीस वर्षे प्राप्त झाले आहे.. संस्थेने 13 कोटीचा व्यवसाय पार केला असून शेळगी भागातील दुर्बल घटक क्षेत्रातील मार्केट यार्ड, जुना बिडी घरकुल शहरातील गरजू सभासदांना कर्ज वाटप करणारी पतसंस्था म्हणून ओळखली जाते.
सभेचे अध्यक्ष स्थान सदाशिव गजानन उडता सेवानिवृत्त सीनियर ऑफिसर जनता सहकारी बँक सोलापूर अध्यक्षस्थानी होते त्यांनी पुढील प्रमाणे विचार मांडले सर्व उपस्थित सभासदांना संस्थेत आपले व आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने बचत ठेव खाते उघडण्यात यावे तसे संस्थेतील इतर सुविधांचा लाभ घ्यावा, त्यांनी त्यांच्या बँकेचा असलेला कामाचा अनुभव सर्वांसमोर मांडला व संस्थेच्या प्रगतीच्या बाबत समाधान व्यक्त केले याप्रसंगी त्यांनी विचार मांडले. पतसंस्थेचे मॅनेजर नागनाथ गुंडमी यांनी विविध विषयाचे वाचन केले. सूत्रसंचालन संचालक मुख्याध्यापक महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त सुनील पुजारी यांनी केले. व्हाईस चेअरमन महादेव जावळे यांनी आभार मानले. याप्रसंगी शिवलिंग शहाबादे, प्रकाश बिराजदार, प्रकाश हिरेमठ, राजीव मठ, सुरेश हत्ती, राजशेखर रोडगेकर, गुरु अचलेरे, बिराजदार, सुभाष घुंगरे व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते वरून राजाच्या साक्षीने खेळीमेळीच्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button