गावगाथा

महात्मा बसवेश्वर यांचे विचार प्रेरणादायी – प्रा.चंद्रकांत पोतदार; भुरीकवठे येथील ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी ..‌‌

जयंती विशेष २०२४

महात्मा बसवेश्वर यांचे विचार प्रेरणादायी – प्रा.चंद्रकांत पोतदार; भुरीकवठे येथील ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी ..‌‌

वागदरी – येथील भुरीकवठे तालुका अक्कलकोट येथील ज्ञानदान सार्वजनिक मोफत वाचनालय येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब कलशेट्टी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे सचिव प्रा श्री चंद्रकांत पोतदार संस्थेचे कर्मचारी संजय सोलापूर व बहुसंख्य ग्रामस्थ वाचक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.


महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात जातीअंताच्या चळवळीचे नेतृत्व केले. समता, बंधुता, मानवतेचे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. महात्मा बसवेश्वर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात मानवता, एकता, जातीअंत हे मुद्दे समान आहेत. याच महामानवांच्या विचारांची गरज आहे’,असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रा श्री चंद्रकांत पोतदार व्यक्त केली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button