ठळक बातम्यागावगाथाजिल्हा घडामोडी

PCMC : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत कलम १४४ लागू ; पाहा काय आहेत निर्बंध

प्रतिनिधी / दयानंद गौडगांव 

HTML img Tag Simply Easy Learning    

निगडी दि.११, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तिसऱ्या टप्प्यात मतदान होणारे लोकसभेचे पुणे, शिरूर व मावळ या मतदारसंघातील भाग आहे. निवडणुका सुरळीत, शांततेत पार पडण्यासाठी आयुक्तालयाच्या हद्दीत सीआरपीसी कलम 144 प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रांपासून ठराविक अंतरापर्यंत अनेक बाबींना निर्बंध असणार आहेत. हे आदेश मंगळवारी (दि. 14) रात्री बारा पर्यंत लागू असणार आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हे आदेश दिले आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

खालील बाबींसाठी निर्बंध असतील –

HTML img Tag Simply Easy Learning    

मतदाना दिवशी मतदान केंद्रात तसेच मतदान केंद्राचे 100 मीटर परिसरात प्रिसायडींग ऑफिसर, निवडणुक कामकाज संदर्भाने नेमलेले शासकीय व्यक्ती, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी नेमलेले शासकीय व्यक्ती ज्यांना निवडणूक संदर्भात संपर्क करणे आवश्यक आहे. यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना मोबाईल फोन, स्मार्ट फोन, वायरलेस किंवा संपर्क साधने वापरण्यास मनाई आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

मतदान केंद्राचे 200 मीटर परिसरात तात्पुरत्या स्वरुपाचे पक्ष कार्यालय कोणत्याही धार्मिक, शैक्षणिक आस्थापनेत किंवा किंवा अतिक्रमण करुन उभारण्यास मनाई आहे.

संरक्षण प्राप्त व्यक्तीना मतदान केंद्राचे 100 मीटर परिसरात सुरक्षा रक्षकासह प्रवेश करण्यास मनाई आहे.

मतदान केंद्राचे 200 मोटर आतमध्ये इलेक्शन बूथ लावता येणार नाही. एका इमारतीत एकापेक्षा जास्त मतदान बूथ असतील तरी देखील त्या इमारतीसाठी एका उमेदवाराला एकापेक्षा जास्त बूथ लावता येणार नाही.

मतदान दिवशी मतदान केंद्राचे 200 मीटर क्षेत्रामध्ये प्रचार करण्यास मनाई आहे.

मतदान केंद्राचे 200 मीटर त्रिज्यामध्ये वाहन आणण्यास मनाई आहे.

लाऊड स्पीकर, मेगाफोन, आरडाओरडा करणे, गोंधळ करणे, दुवर्तन करणे, अशा प्रकारास मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मनाई आहे.

मतदान समाप्तीकरिता निर्धारीत केलेल्या वेळेच्या 48 तास आधीपासून ज्या मतदारसंघात मतदान होणार आहे तेथे मतदार नसलेले राजकीय कार्यकर्ते वा प्रचार कार्यकर्ते त्यांना त्या मतदारसंघात थांबणेस मनाई असेल.

मतदान समाप्ती करिता निर्धारीत केलेल्या वेळेच्या 48 तास आधीपासुन राजकीय प्रचार करण्याच्या उद्देशाने कोणतेही बल्क मेसेज पाठविण्यास मनाई असेल.

मतदान दिवशी मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र / हत्यार बाळगण्यास मनाई आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button