गावगाथा

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त “महाकाल” देखावा, भव्यदिव्य मिरवणूक संपन्न….

जयंती विशेष

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त “महाकाल” देखावा, भव्यदिव्य मिरवणूक संपन्न….

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रा.डाॅ.सुधीर पंचगल्ले मुरूम ता.१७) महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मुरूम शहरातील महात्मा बसवेश्वर युवक मंडळाच्या वतीने दि.१० मे रोजी मुरूम शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात बसवेश्वरांचे पूर्णाकृती पुतळ्याचे स्थापना करण्यात आली होती, दि.१६ मे वार गुरुवार रोजी शहरातील महात्मा बसवेश्वर चौक,साठे चौक,अशोक चौक,टिळक चौक,किसान चौक,सुभाष चौक,गांधी चौक,हनुमान चौक मार्गे “महाकाल देखावा” सादरीकरण करीत भव्यदिव्य मिरवणूक सोहळयाने सांगता संपन्न झाले. प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष दत्ता हुळमुजगे, नंदकुमार उपासे,शरद स्वामी,मनोज स्वामी,ओमकार पाटील आदींच्या हस्ते पूजन संपन्न झाले. हरियानातून आलेल्या अघोरीनी मिरवणुकी दरम्यान चौकात अघोरी नृत्य,पाच फण्याचे नागासह भगवान महाकाल, नंदीवरील विराजमान होऊन भगवान शंकर अवतरले, जिवंत देखाव्यांनी नागरिकांना मंत्रमुग्ध केले होते. अघोरी विधी, विभूती भस्माची उधळण करीत भव्यदिव्य देखाव्यांनी मुरूम नगरीत भक्तिमय वातावरण पसरला होता, हरियाणातील अघोरी संघ कलाकारांनी डमरू आणि शिव धून तालावर अंगावर राख लावून विविध मुद्रामध्ये नृत्य सादर केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

ठीक ठिकाणी आगीच्या माध्यमातून ओम,त्रिशूल,डमरूचे चित्र रेखाटले, शहर व परिसरातील नागरिकांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता तर ठीक ठिकाणी महिला वर्गातून देखावा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. प्रत्येक ठिकाणी भक्तीभावाने मिरवणुकीचे स्वागत केले. मंडळाने सुंदर उपक्रम राबविल्याचे नागरिकांतून स्तुती केले जात आहे. एकंदरीत मिरवणूक सोहळा शांततेत आणि भक्तिमय वातवरणात पार पडला, मिरवणूक सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बसव भक्त महेश निंबरगे,सतीश शेळके, नागेश कारभारी, संजय धुमुरे, शरणप्पा वाडे, प्रदीप गव्हाणे,शिवा दुर्गे,गौरीशंकर बोंगरगे,ओमकार कुंभार,सिधलिंग हिरेमठ,राजकुमार वाले,सागर खूने,अनिल चव्हाण आदींनी परिश्रम घेतला यादरम्यान असंख्य बसवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकी दरम्यान मुरूम पोलीस प्रशासनाच्या वतीने सहायक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे,पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौज तैनात करण्यात आला होता. नगर परिषद, महावितरण कर्मचाऱ्यांचा सहकार्य लाभला.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button