गावगाथा

*मृदंग वादनाचे जादूगार मयूरजी सुतार ; मयूरजी मृदंग वाजणाने सांगवीसह पंचक्रोशीतील श्रोते मंत्रमुग्ध*

वादन

*मृदंग वादनाचे जादूगार मयूरजी सुतार ; मयूरजी मृदंग वाजणाने सांगवीसह पंचक्रोशीतील श्रोते मंत्रमुग्ध*

✒️ *प्रविणकुमार बाबर / सांगवी बु*

अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु येथे अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू असून, या सप्ताह दरम्यान पहाटे काकडा, आरती, भजन, कीर्तन, ज्ञानेश्वरी वाचन, प्रवचन, असे अनेक भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन या सप्ताह दरम्यान केले असून, या सप्ताला कोल्हापूर जिल्ह्यातील मृदंग वादक श्री मयूरजी बाळासो सुतार, वय – 30 ह्यानी आपल्या मृदंगाच्या जादुणे सांगवी बु सह पंचक्रोशीतील भाविक भक्त, श्रोते यांच्या मनात घर केले असून, अतिशय तालात, व मृदंग वाजवण्यात पटाईत असलेले मयूरजी मूळचे कोल्हापूर तालुक्यातील गारगोटी येथील राहिवासी असून, ते वारकरी संप्रदाय तीर्थछेत्र देहू आळंदी येथे 2005 साला पासून आप्पासाहेब वासकर महाराज अध्यात्मिक शिक्षण संस्था आळंदी येथे मृदंग शिकत असून, त्यांचे गुरु पंडित सुखद दादा मुंडे, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे मृदंग वादनाचे शिक्षण पूर्ण होऊन, मयूर जी हे स्वतः आता संपूर्ण भारत भर ऑनलाईन मृदंग वादनाचे क्लास घेत आहेत. आता त्यांच्याकडे 300 हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. शिवाय महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, येथे प्र्याक्टीकली क्लास चालू आहेत.
विशेष बाब म्हणजे, या वाद्यावर अखंड परिश्रमातून हुकूमत मिळवलेले कोल्हापूर चा पैलवान पुण्याच्या आळंदी च्या मृदंग वादनाच्या तालमीत पटाईत कलाकार श्री मयूरजी सुतार ह्यांनी पखवाज वादनामध्ये स्वतःचा स्वतंत्र ठसा निर्माण केला आहे. ज्या वयात मुले पेन्सिल पकडून चित्र काढण्याचा प्रयत्न करतात, खेळण्याचे बागडण्याचा त्या वयात मयूरजी यांनी पखवाज हातात घेतला. मयूरजी यांचे वडील शेतकरी,… शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या मयूरजी यांना पखवाज या वादयाबद्दल आकर्षण निर्माण झाले. त्यांनी पखवाज शिकून त्यावर प्रभूत्व मिळविण्याचा निश्चय केला. वडिलांनी देखील त्यांना प्रोत्साहन दिले. पंडित सुखद दादा मुंडे यांच्या हाताखाली भजन बाज शिकत असताना पाहता पाहता वाद्य त्यांनी लिलया हाताखाली घेतले.
आतापर्यंत मयूरजी यांनी महाराष्ट्रात व तसेच राजस्थान, गोवा, कर्नाटक, यासह भारतात अनेक सोलो परफॉर्मन्स, अभंगवाणी, मृदंगवाणी, बासरी साथ, सितार, हार्मोनियम, अनेक वादकांना साथ सांगत दिली असून, शिवाय मोठं मोठे सप्ताह, कीर्तन, प्रवचन, या ठिकाणी देखील कला सादर करून रसिकांच्या मनात घर केले आहे.
भारतीय संगीत शिकण्यासाठी जगभरातून लोक भारतात येतात. सध्या पश्चात्त्य संगीताएवढा शास्त्रीय संगीताला देखील वाव आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button