Nigdi : 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर चाकूने वार केल्याप्रकरणी तरूणाला अटक

निगडी (प्रतिनिधी): निगडी येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.17) ओटास्कीम निगडी येथे घडली आहे.

याप्रकरणी विजयानंद आत्माराम भागवत (वय 29 रा.निगडी) याला अटक करण्यात आले आहे. निगडी पोलीस ठाण्यात नारायण बळीराम लोखंडे (वय 40 रा.निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा व त्यांचा पुतण्या 13 वर्षीय हे क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते .यावेळी फिर्यादीनुसार मुळाशी आरोपीचे भांडण झाले. हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी यांचा 13 वर्षीय पुतण्या ने मध्यस्ती केली. या रागातून आरोपीने त्याच्याकडील चाकूने पुतण्याच्या गळ्यावर वार केले. यावरून आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
